file photo 
मराठवाडा

हिंगोली : कोरोना संशयितांना मिळणार ई -संजीवनी, ओपीडीद्वारे घरबसल्या माहिती

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोना संशयितांना तातडीने आरोग्य सल्ला उपलब्ध व्हावा यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने हा उपक्रम सुरू केला असून, ई संजीवनी अँपद्वारे व्हिडीओ कॉलिंग तर चॅटींग ही करता येणार असल्याने रुग्णांना घरबसल्या एका क्लिकवर माहिती मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार  यांनी दिली.

जिल्ह्यात केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मदतीने जेष्ठ नागरिक, इतर नागरिकांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने ई- संजीवनी अँपद्वारे घरबसल्या आरोग्य सल्ला सेवा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना संसर्ग काळात नागरिक रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करीत होते.अनेक जण अंगावर दुखणे काढत आहेत.त्यामुळे आजार गंभीर होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असते.हा प्रकार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने ई-ओपीडी विकसित केली आहे.ही ओपीडी सकाळी ९.३०ते १.३० व दुपारी तीन ते पाच यावेळेत सुरु राहणार आहे. रविवारी मात्र बंद राहील असे डॉ.पवार यांनी सांगितले.

मोबाईलच्या माध्यमातून या ई-ओपीडीचा लाभ घेता येणार आहे.संबंधितांना ओटीपीचा वापर करून मोबाईलवर व्हेरिफिकशन करावे लागेल.त्यानंतर रुग्णासाठी असलेला नोंदणी फॉर्म भरून टोकन साठी विनंती पाठवावी लागेल.आदिपासून आजार असतील तर त्याची माहिती दिल्यानंतर 

एसएमएसच्या माध्यमातून पेशन्ट आयडी व टोकन मिळणार आहे.एसएमएस आल्यानंतर पेशन्ट आयडी सह लॉगिन करावे,प्रतिक्षालय ओपशन आल्यानंतर थोड्या वेळात कॉल नाऊबटन ऍक्टिव्हेट होईल.व्हिडीओ कॉल सुरु झाल्यानंतर  स्क्रीनवर डॉक्टर येतील.सदर डॉक्टर आरोग्य विषयक माहिती देऊन ई प्रिस्क्रीपशन द्वारे  औषधी व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देतील.  औषधपत्र डाऊनलोड केल्यानंतर डॉक्टरा मार्फत देण्यात आलेली औषधी इ प्रिस्क्रीपशन पेपर दाखवून नजीकच्या सरकारी दवाखान्यातून औषधी खरेदीचा मार्ग मोकळा होईल.ही मोफत सेवा असून यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT