Hingoli News 
मराठवाडा

हिंगोलीत विभागीय पथकाने घेतला उपाययोजनांचा आढावा

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, तसेच प्रतिबंधीत क्षेत्रात लॉकडाउनच्या कालावधीत प्रतिबंधीत आदेशाची प्रभावीपणे अमंलबजावणी व्हावी यासाठी उपआयुक्त वर्षा ठाकूर व पराग सोमण गुरुवारी (ता. १४ मे) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बैठकीत त्यांनी विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरीता आज उप आयुक्त वर्षा ठाकूर आणि उप आयुक्त पराग सोमण हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी साई रिसॉर्ट आणि राज्य राखीव पोलीस दल येथे क्वॉरंटाईनमधील जवान, तसेच जिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या जवानांची भेट घेवून प्रकृतीची विचारणा केली.  हिंगोली येथील मुलांच्या वसतीगृहात तयार करण्यात आलेल्या कोवीड रुग्णालय आणि औंढा येथील कोवीड केअर सेंटरलाही भेट देवून पाहणी केली. 

यावेळी उप आयुक्त वर्षा ठाकूर आणि उप आयुक्त पराग सोमण यांनी जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत विविध बाबींचा आढावा घेवून सूचना दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांनी घरामध्ये राहूनच सुरक्षितता बाळगावी, सार्वजनीक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी करण्यात येत आहे. बाहेरील जिल्ह्यात किंवा राज्यात कामासाठी स्थलांरीत मजूर व कामगार हे आता जमेल त्या पध्दतीने आप-आपल्या गावाकडे परत येत आहेत. परत येणाऱ्या सर्व नागरिकांची जिल्ह्याच्या सिमेवर तयार करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर सतर्क राहून तपासणी करावी. 

या नागरिकांना कुठल्याही आजरासंदर्भात शंका वाटल्यास त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करावेत. तसेच जिल्ह्यात परत येणाऱ्या प्रत्येक मजूर व कामगारापासून कोरोनाचा प्रार्दूभाव होणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घेणे आवश्यक आहे. तपासणी नाक्यावर बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याकरीता प्रशिक्षीत कर्मचाऱ्याची नाक्यावर नियुक्ती करण्यात यावी. तसेच याठिकाणी तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालूका आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी देवून योग्यरित्या तपासणी होत असल्याची खात्री करावी. 

बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची योग्यरित्या तपासणी न झाल्यास त्यांच्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता जिल्ह्याच्या सिमेवरील सर्व तपासणी नाक्यावर नागरिकांची तपासणी योग्यरितेने होणे अत्यंत आवश्यक आहे.

बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातील ज्या नागरिकांना आपल्या गावी जायचे असल्यास त्यांना सहकार्य करा. तसेच इतर आजाराच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी खाजगी रुग्णालये सुरु करण्याचा प्रयत्न करावा. तसेच विशेष करुन गर्भवती महिलांना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळेल याकरीता विशेष नियोजन करण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT