परप्रांतीय पणत्यांवर हिंगोलीकरांची दिवाळी sakal
मराठवाडा

हिंगोली : परप्रांतीय पणत्यांवर हिंगोलीकरांची दिवाळी

स्थानिक पणत्या विक्रेते अडचणीत ः कमी भावात मिळत असल्याने नागरिकांचा कल

राजेश दारव्हेकर

हिंगोली : दिवाळी जवळ आल्याने फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन पणत्या तयार करण्याचे काम स्थानिक कारागिरांनी सुरू केले असून शहरात येणाऱ्या परप्रांतीय पणत्याच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

दिवाळीचा सण जवळ आल्याने या प्रकाशाच्या सणात पणत्याला मोठे महत्व असते. त्यामुळे एका घरी किमान पाच ते सहा डझन पणत्या खरेदी केल्या जातात. यामुळे त्याची मागणी पाहत पणत्या तयार करणाऱ्या कारागिरांनी ते तयार करण्याचे काम सुरू केले आहे. शहरात गवळीपुरा, रिसालाबाजार, महादेववाडी या ठिकाणी हे कारागीर राहतात.

पणत्या तयार करण्यासाठी काळी माती, राख याचा उपयोग करावा लागतो पूर्वी ही माती मोफत मिळत असे. आता मात्र ती विकत घ्यावी लागते दीड ते दोन हजार रुपयांना एक टॅक्टर मिळते.

तसेच घोड्याची लिद पाचशे ते सातशे रुपयांप्रमाणे विकत घ्यावी लागते. त्यानंतर काळी माती वस्त्रगाळ करून मऊ करून त्याचा चिकनमेन गोळा तयार केला जातो. तो गोळा चाकावर ठेवून काठीच्या मदतीने चाक फिरवून मातीच्या गोळ्याना आकार देऊन पणत्या तयार केल्या जातात. त्यानंतर पणत्या उन्हात सुकवल्या जातात, त्यासाठी भट्टी लावली जाते, यासाठी इंधन म्हणून निकामी झालेल्या टायरचा उपयोग करून भाजल्या जातात. त्यांना गेरूचा रंग देऊन त्या विक्रीसाठी जातात. त्या २० ते २५ रुपये डझनप्रमाणे विकल्या जातात.

यासाठी बराच कालावधी लागत असल्याचे कारागीर सांगतात. ऐवढे करून परप्रांतीय व्यवसायिक शहरात लाल मातीच्या पणत्या विक्रीस घेऊन येत आहेत. काळ्या पणत्यापेक्षा त्या स्मूथ दिसतात व त्याचा भाव देखील कमी असल्याने त्याची खरेदी वाढली असत्याचे कारागीर सांगत आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा व्यवसाय अडचणीत आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गणपती, महालक्ष्मी, दुर्गादेवी, पणत्या माठ, सुगडी या व्यवसायातून उदरनिर्वाह चालतो दिवाळीत पणत्याला मागणी मात्र बाहेर राज्यातील पणत्या शहरात असल्याने स्थानिक पणत्या मागे पडत असल्याने अडचणी येत आहेत.

- विजय उचाडे, कारागीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT