file photo 
मराठवाडा

हिंगोली : शेतकऱ्यांनी बांधावर बॅनर लावून थेट प्रधानमंत्री यांना पाठवले निवेदन

विठ्ठल देशमुख

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधावर  केंद्रीय कृषिमंत्री बांधावर दाखवा व बक्षीस  मिळवा अशा प्रकारचे बँनर लावल्याने हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.

गेल्या काही दिवसापुर्वी या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरु होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

पाच वर्षांपासून कोरड्या दुष्काळाच्या झळा

विशेष म्हणजे अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले तरी सुध्दा याबाबत केंद्र शासनाने अद्याप कुठलाच निर्णय घेतला नाही. मराठवाड्याला गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या असून यावर्षी मान्सुन लागल्यापासून पावसाने जोरदार सुरुवात केली होती. सोयाबीन, मुग, उडीद, कपाशी आदि पिके लागवड करून झाल्यानंतर पावसाचा जोर अधिक वाढला व खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरुवातीला शेतकऱ्यांनी या पिकांकडून पाहुन मोठमोठी स्वप्न पाहिली. 

अतिवृष्टिमुळे सेनगाव तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मागच्या चार वर्षात या शेतकऱ्यांच्या पदरात काहीच शिल्लक राहिले नव्हते त्यामुळे बँकेचे थकित कर्ज, खाजगी कर्ज काढून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर यावर्षी ओल्या दुष्काळाचे नवे संकट उभे राहिले. हाताशी आलेला घास वरुनराजाने हेरावून घेतला. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी शेतकरी वर्गावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले. अतिवृष्टिमुळे सेनगाव तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही केंद्र शासनाकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही. शिवाय केंद्रीय कृषि मंत्र्याने याबाबत आतापर्यंत कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीयकृत बँका पिक कर्जासाठी टाळाटाळ करीत आहेत, अतिवृष्टिमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी, आम्ही महाराष्ट्रा सोबतच केंद्राचे सुध्दा शेतकरी आहोत अशा प्रकारचे बँनर सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आपल्या बांधावर लावून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेतील याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. "केंद्रीय कृषि मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दाखवा आणि बक्षीस मिळवा याबाबत सेनगावचे तहसीलदारांमार्फत थेट प्रधानमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिक ६० टक्के पाण्याखाली आले असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे बँकांनी कर्ज वाटपास टाळाटाळ न करता सरसगट कर्ज वाटप करण्यात यावे. व तसेच राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सरसगट मदत जाहिर करावी

- ओमप्रकाश देशमुख (जि.प. सदस्य) : 

गेल्या दोन महिन्यापासून झालेल्या मूसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचुन मुग, उडीद, सोयाबीन, कपाशी आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील केंद्र शासनाकडून एकही पाहणी करायला आले नाहीत. सेनगाव तालुक्यातील अनेक भागात शेतामध्ये पाणी साचुन सोयाबीन पिक पूर्णतः पाण्याखाली येऊन मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. बँका सुध्दा पिककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे केंद्र सरकारने तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.

- नामदेव पंतगे (शेतकरी नेते) 

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT