file photo 
मराठवाडा

हिंगोली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात फलोत्पादनामध्ये दिवसेंदिवस होत चाललेली वाढ लक्षात घेता फळे व भाजीपाला या पिकांची व्यवसायिक पध्दतीने लागवड करुन घेता यावे तसेच निर्यात करता यावे. यासाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड व रोग मुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

त्यामुळे भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटीकेमुळे स्थानिक शेतक-यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे, पिक रचनेत बदल घडवून आणने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा दर्जेदार किड व रोग मुक्त रोपे तयार करण्यास लहान रोपवाटीका उभारण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरु केली आहे.

अर्ज करण्याची प्रक्रीया ता. दोन ऑक्टोबर ते ता. १८ ऑक्टोबर या दरम्यान

शेतक-यांना स्वत:च्या मालकीचे किमान ०.४ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे व कायम स्वरुपी पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. या योजनेस महिला कृषि पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील. महिला गट, महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य  राहील.  तसेच भाजीपाला उत्पादक व अत्यल्पभूधारक शेतकरी यांना तृतीय प्राधान्य राहील. इच्छुक शेतक-यांनी महा डिबीटी या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत. अर्ज करण्याची प्रक्रीया ता. दोन ऑक्टोबर  ते ता. १८ ऑक्टोबर,  या दरम्यान राहील याची नोंद घ्यावी.

अनुदान दोन लाख ३० हजार असणार आहे

या योजनेस जास्तीत जास्त १९ गुंठे क्षेत्र अनुदानास पात्र राहील व प्रकल्प खर्च मर्यादा ४ लाख ६० हजार एवढी असून अनुदान ०२ लाख ३० हजार असणार आहे. हे अनुदान दोन हप्त्यामध्ये वितरीत करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय फलोत्पादन  अभियान धरतीवर राबविण्यात येईल. या योजनेंतर्गत प्रकल्प उभारणी नंतर प्रकल्प प्रथम हप्ता ६० टक्के व उर्वरीत द्वितीय हप्ता ४० टक्के अनुदान वितरीत करण्यात येईल.

इच्छुक व पात्र शेतक-यांनी अर्ज करावेत असे आवाहन येथील जिल्हा अधिक्षक कृषि

योजनेचा कालावधी सन  २०-२१ असा राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धारकानी यापूर्वी शेडनेट हाऊस, पॉली हाऊसचा कुठल्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. लक्षांकापेक्षा जास्तीचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने अर्जाची निवड करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र शेतक-यांनी अर्ज करावेत असे आवाहन येथील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे. 

संपादन - प्रल्हाद कांबळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शेतकऱ्याचा शेतातच आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT