अर्बन परिवार
अर्बन परिवार  
मराठवाडा

हिंगोली : अर्बन परिवाराकडून कोरोना रुग्णांसाठी मोफत वाहन सेवा

राजेश दार्वेकर

हिंगोली : शहरातील हिंगोली अर्बन परिवार (Hingoli arban parivar) सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतो. विविध उपक्रमातून समाजसेवा करण्याचा उपक्रम असतो. सध्या कोरोना काळात शहरातील (covid) नागरिकासाठी घरापासून रुग्णालयापर्यंत रुग्णांना येण्या जाण्यासाठी मोफत सेवा सुरु केली आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (ता. १३) पार पडला. (Hingoli: Free vehicle service for Corona patients from Urban Family)

शहरातील हिंगोली अर्बन परिवार सामाजिक उपक्रमांत नेहमी पुढाकार घेता. यात अन्नदान, गरजूंना शिक्षणाची मोफत व्यवस्था त्यांना लागणारी पुस्तके व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले जाते. यासह रोटी बँकेच्या उपक्रमातून गरजुना घरपोच अन्न पुरविले जाते. यासाठी जेके लिटल स्कूलमध्ये दररोज येणाऱ्या विद्यार्थ्यांना डब्ब्यात एक पोळी अधिक आणावी असे सांगितले जाते. व ही एक पोळी जमा करुन गरजुपर्यंत पुरविली जाते. सध्या कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने हा उपक्रम बंद आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांचे आधार अद्यावत करण्यात विद्येचे माहेरघर शेवटच्या रांगेत; सिंधुदुर्गची बाजी

दरम्यान, मागच्या वर्षी कोरोना कालावधीत हिंगोली अर्बन परिवाराने गरजुना घरपोच मोफत जेवणाचे डब्बे पुरविले तसेच कोरोना योध्दांना दररोज नास्त्याची व्यवस्था केली. तर अडचणीत असलेल्या शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत दोन वेळेस भोजनाची व्यवस्था केली. यासह विविध उपक्रमात हिंगोली अर्बन परिवार पुढाकार घेतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पुरग्रस्ताना मदत तसेच शासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहाना प्रतिसाद दिला जातो.

सध्या कोरोनाची संख्या वाढत आहे. शहरातील विविध भागात रुग्ण आढळले आहेत. यासाठी शासनाने सुरु केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सहभागी होत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पुढाकार घेत चारशे जणांना मोफत लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

दरम्यान, शहरात संचारबंदी सुरु असल्याने वाहने देखील बंद आहेत रुग्णालयात जाण्यासाठी अनेकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे ही गरज ओळखून हिंगोली अर्बन परिवाराने यात सहभागी होत हिंगोली शहरातील कोविड रुग्णासाठी एका हाॅस्पीटलमधून दुसऱ्या हाॅस्पीटल मध्ये किंवा क्वारंटाईन सेंटर मधून घरापर्यंत वाहतूक व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.

दरम्यान हिंगोली महिला अर्बन बँक व राष्ट्रीय स्वयंसेवक सघ यांचे संयुक्त विदमाने शहरातील कोविड रुग्णकारिता निशुल्क प्रवास सेवा सुरु करण्यात आली असून जिल्हा सामान्य रुग्णालय येथून ही सेवा आज जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. मंगेश टेहरे यांचे हस्ते ही सेवा लोकार्पण करण्यात आली. या वेळी हिंगोली महिला अर्बनचे जयेश खरजुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे शहर संघचालक महेश बियाणी, जिल्हा व्यवस्थापक प्रमुख अँड. दिलीप झंवर, सदभाव प्रमुख सुखंबीरसिंग अलग, रुग्णासेवा समितीचे संदेश साहू, दीपक बासटवार, सुरेंद्र सोनी, अँड. संतोष धुडकेकर, सुरेश चिटकरे,आदी उपस्थित होते. या सेवेद्वारे शहरातील केवळ कोविड रुग्णांना रुग्णालयातून घरी, किंवा इतर चाचणी तसेच दुसऱ्या कोविड सेन्टर मध्ये मोफत ये- जा करणे सोयीस्कर होईल. यासाठी दीपक बासटवार व सुरेंद्र सोनी यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT