file photo 
मराठवाडा

हिंगोलीला पुन्हा धक्का : आठ जणांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शुक्रवारी (ता. २६) रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार औंढा तालुक्यातील भोसी येथील एका २२ वर्षीय गरोदर महिलेसह कळमनुरी तालुक्यातील सात व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. यात एसआरपीएफ जवान, एक नोएडा तर तिसरा मुंबईवरून गावी परतला आहे. इतर चार जणांना 
कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कोरोना बाधित संपर्कातील असल्याचे डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २५९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण ३० रुग्णावर उपचार सुरू आहेत.तसेच कळमनुरी येथे १६ रुग्णावर उपचार सुरू आहेत यात काजी मोहला सहा, टव्हा एक, कवडा सहा, गुंडलवाडी दोन, बाबळी एक यांचा समावेश आहे. तर कोविड सेंटर कळमनुरी येथे चार रुग्णावर उपचार सुरू आहेत यामध्ये एसआर पीएफचे तीन जवान आहेत. तर वसमत येथे दोन रुग्णावर उपचार सुरु आहेत यात बुधवार पेठ एक, चांद गव्हाण एक यांचा समावेश आहे.

सेनगाव येथे एकावर उपचार सुरू 

याशिवाय लिंबाळा येथील केअर सेन्टर येथे पाच रुग्ण असून यात कनेरगाव नाका एक, संतुक पिंपरी एक, तालाब कट्टा एक, रिसाला दोन, यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात जवळा बाजार येथील एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर सेनगाव येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.

३८०७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे

जिल्ह्यात एकूण क्वारंटाईन सेंटर व आयसोलेशन वॉर्ड मिळून ४४०२ रुग्णांना भरती केले आहे. त्यापैकी ३९१८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर ३८०७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ५९४ रुग्ण भरती असून २८७ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे डाँ श्रीवास यांनी सांगितले  आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT