file photo 
मराठवाडा

हिंगोलीला पुन्हा धक्का, वसमतचे आठ जण पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : वसमत येथे मुंबई येथून आलेल्या सतरा जणाना शासकिय विलगीकरण कक्षात ठेवलेल्या पैकी रविवारी (ता. १७) आठ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली आहे. 

हिंगोली जिल्‍ह्यात ९१ बाधीतापैकी संख्या कमी होत नुकतीच ती सातवर आली होती. पुन्हा जिल्‍ह्‍यात नवीन आठ रुग्ण आढळल्याने हिंगोलीकरांची चिंता वाढली आहे. सद्या जिल्‍ह्यात १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. एकीकडे जिल्‍हा ग्रीन झोनमध्ये येत असताना पुन्हा आठ रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण आहे. जिल्‍ह्यात या पुर्वी ९१ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८४ जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. 

जिल्ह्यातील रुग्ण संख्या ९९ वर 

त्‍यामुळे जिल्‍ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा सातवर आला असताना रविवारी परत त्‍यात भर पडली. वसमत येथे शासकिय विलगीकरणात दाखल असलेल्या व्यक्‍तीपैकी आठ जण पॉझिटिव्ह असल्याचे जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. श्रीबास यांनी सांगितले. आता जिल्‍ह्‍यात ९९ रुग्ण झाले आहेत. त्‍यापैकी ८४ रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना सुट्टी देण्यात आली आहे. व सद्यस्‍थितीत १५ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहेत.

 ९१ रुग्णापैकी ८४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी 

दरम्‍यान, शनिवारी (ता. १६) औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह जवानांना भरती करण्यात आलेल्या सातपैकी तीन रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे शनिवारी केवळ सात रुग्ण पॉझिटिव्ह होते. यापुर्वी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ९१ वर गेल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अक्षरशा कोमात गेली होती. आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली होती. मात्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनाला धारेवर धरले होते. कोरोना योध्याना जेवण चांगले मिळत नव्हते याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर जेवणात सुधारणा झाल्यामुळेच कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत घट होत आली आहे. जिल्हा रुग्णालयात ९१ रुग्णापैकी ८४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. परंतू आता वसमत येथे मुंबई येथून आलेल्या व शासिकय विलगीकरण कक्षात असलेल्या सतरा पैकी आठ जण पॉझीटीव्ह निघाल्याने हा आकडा आता १५ पोहचला आहे. 

आठ जण पॉझिटिव्ह झाल्याचे चिंता वाढली

जिल्‍ह्यात प्रशासकिय यंत्रणा सतर्क असून संचारबंदीची काटेकोरपणे अमंलबजावणी केली जात आहे. तर एक दिवसाआड भरणाऱ्या बाजारात देखील सोलश डिस्‍टन्सचे पालन होत असल्याने कोरोनाचा फैलाव थांबला आहे मात्र आता बाहेर गावातून येणाऱ्या नागरीकातून त्याचा फैलाव सुरू झाल्याचे चित्र आहे. त्‍याचाच प्रकार वसमत येथे आला असून येथे मुंबई येथून आलेल्या व विलगीकरणात असलेल्या पैकी आठ जण पॉझिटिव्ह झाल्याचे चिंता वाढली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT