Hingoli app
Hingoli app 
मराठवाडा

हिंगोलीत आता घरपोच साहित्य मागविता येणार

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात होणारी गर्दी कमी करण्यासाठी नगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात दिवसाआड बाजार सुरू करण्यात आला आहे. तसेच घरपोच किराणा, औषधी उपलब्ध करून देण्यासाठीदेखील नियोजन करण्यात आले असून त्‍यासाठी ‘हिंगोली नगरपरिषद’ नावाने ॲप तयार करण्यात आले आहे.

हिंगोली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपक्रमांचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. यात लॉकडाउनच्या काळात गरजूपर्यंत अन्नधान्य मिळावे, यासाठी मदत संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. जमा झालेल्या धान्याचे वाटप गरजूंना केले जात आहे.

‘हिंगोली नगरपरिषद’ नावाचे ॲप

 बाजारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी किराणा व औषधी दुकानांची यादी तयार करून त्‍याचे मोबाइल नंबरदेखील नागरिकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचविले आहेत.
तरीदेखील बाजारात नागरिक खरेदीसाठी येत आहेत. आता पालिका प्रशासनाने ‘हिंगोली नगरपरिषद’ नावाचे ॲप उपलब्ध करून दिले आहे. 

बिलाप्रमाणे त्‍याची रक्‍कम द्यावी लागणार

त्यावर नाव नोंदणी केल्यास नागरिकांना गरजेप्रमाणे घरपोच किराणा, भाजीपाला, औषधी, फळे मिळणार आहेत. यासाठी यादी करून ती यादी विक्रेत्यांकडे देता येणार आहे. सामान घरपोच मिळाल्यानंतर बिलाप्रमाणे त्‍याची रक्‍कम द्यावी लागणार आहे. घरी थांबूनच नागरिकांनी ॲपचा वापर करून लागणारे साहित्य, भाजीपाला, औषधी मागवावी, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

पाच हजार मेट्रिक टन धान्याचे वाटप

हिंगोली : जिल्‍हात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या स्‍वस्‍तधान्य योजनेतील लाभार्थींना आतापर्यंत पाच हजार ६५ मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

स्‍वस्‍तधान्य दुकानांतून पुरवठा

लॉकडाउनमुळे सर्व कामे ठप्प आहेत. शासनाच्या विविध योजनेत असलेल्या लाभार्थींना स्‍वस्‍तधान्य दुकानांतून अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. जिल्‍ह्यात आतापर्यंत पाच हजार ६५ मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. यात अंत्योदय योजनेत ९३१ मेट्रिक टन, प्राधान्य कुटुंब तीन हजार ३९ मेट्रिक टन, एपीएल शेतकरी एक हजार २० मेट्रिक टन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंत्योदयसाठी ६६३ मेट्रिक टन धान्य वितरीत करण्यासाठी देण्यात आले आहे.

७९७ स्वस्तधान्य दुकानदारांना धान्य

तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्राधान्य कुटुंबासाठी तीन हजार ८१२ मेट्रिक टन, असे एकूण नऊ हजार ४५८ मेट्रिक टन गहू व तांदूळ मिळून ७९७ स्वस्तधान्य दुकानदारांना शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी देण्यात येत आहे.

दोन हजार ३०८ मेट्रिक टन धान्य उपलब्ध होणार

 त्यापैकी सात हजार १५० मेट्रिक टन धान्य सर्व स्वस्तधान्य दुकानांत उपलब्ध झाले असून उर्वरित दोन हजार ३०८ मेट्रिक टन धान्य शनिवारपर्यंत (ता. १८) सर्व दुकानांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आजपर्यंत पाच हजार ६५ मेट्रिक टन धान्य हिंगोली जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वितरीत झाले असल्याची माहिती श्री. जयवंशी यांनी दिली.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT