file photo 
मराठवाडा

 हिंगोली : निवडणुकीसाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ

विठ्ठल देशमुख

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ होताना पहायला मिळत आहे. पहिला आणि दूसरा दिवस निरंक आहे. मध्ये तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यामुळे अर्जासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी ता.२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंतच आहे. त्यामध्ये ता.२५, २६, २७ हे तीन दिवस कार्यालयीन सुट्ट्या असल्यामुळे पुढाऱ्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली आहे. सेनगाव तालुक्यात ९७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.अर्ज सादर करण्याचा पहिला आणि दूसरा दिवस खाली गेला असून या दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही दिवस निरंक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मागच्या पंचवर्षीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे खुप कमी प्रमाणात होती.

परंतु यावेळी सदस्य पदासाठी उमेदवारी अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जास्त व कार्यालयीन असल्यामुळे निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांची मोठी धावपळ होताना पहायला मिळत आहे. मध्ये तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यामुळे पुढाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही कागदपत्रे जमा करण्यासाठी शासकीय कार्यालये सुरु असणे गरजेचे आहे. मात्र अर्ज सादर करण्यासाठी शासनाने केवळ आठ दिवसाचा कालावधी दिला आहे. परंतु त्यामध्ये सुध्दा दिवस सुट्ट्या असल्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठी धावपळ होताना दिसून येत आहे. 

सेनगाव तालुक्यात दोन दिवस निरंक गेले असून मध्ये तीन दिवसाच्या सुट्ट्या आहेत. तर पुढचे तिनच दिवस कागदपत्रे जमा करण्यासाठी असतील. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगनात उतरणाऱ्या पुढाऱ्यांची मोठी गैरसोय होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्धवट कागदपत्रे घेऊन येत असल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्याचा कालावधी वाढवण्याची गरज भासत आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : प्रभाग १७ मध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत रोख रक्कम आढळली

Maghmela 2026: चर्चला जातो म्हणून निघालेला करोडपती तरुण माघ मेळ्यात बनला संन्यासी; मोबाईल स्टेटसमुळे आईला कळलं गुपित

KDMC Election : शरद पवारांच्या NCP उमेदवाराचं नाव EVM वर चुकीचं! 'शेखर'चं 'शेख' केल्याचा आरोप, मतदारांमध्ये संभ्रम!

BMC Election Voting: मतदार नाव असूनही पर्ची गायब; मुंबई बीएमसी निवडणुकीत मतदारांचा हिरमोड, मतदान न करताच परतावे लागले

Nashik Municipal Corporation Election : पंचवटीत खळबळ! मतदानाच्या काही तास आधी शिवसेना उमेदवार कमलेश बोडके यांच्यावर अपहरणाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT