Hingoli News esakal
मराठवाडा

Hingoli : हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अनेक महिला सहभागी

महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : श्रावणबाळ योजना, संजय गांधी अपंग, विधवा योजनेसह विविध योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान वेतन तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात यावे. यासह इतर मागण्या संदर्भात लाभार्थ्यांनी शुक्रवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (Hingoli) काढला. यावेळी निवेदन देण्यात आले. याबाबत यशोदा कोरडे, शांताबाई मोरे, भारतीबाई कांबळे, वंदना कांबळे, ध्रुपदाबाई शिखरे, रेखा सरोदे, कुसुम हनवते, लता इंगळे, शांताबाई इंगोले, सीमा इंगोले, गयाबाई वाढे या सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, नवीन फाईल मंजुर लाभार्थ्यांचे अनुदान तत्काळ देण्यात यावे. (Hingoli News Schemes Beneficiaries March On Collector Office)

दोन-दोन वर्षांपासून प्रकरणे दाखल असुन सुद्धा मंजुरी झालेला विलंब तो तत्काळ मार्गी लावावा, हिंगोली तालुका तहसिल कार्यालयामधून स्वस्तधान्य दुकानदारामार्फत भेसळयुक्त राशन वाटप करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी, महिला कार्यकर्त्यांना उगीरभाषा वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य चौकशी करुन निलंबित करावे, शासनाच्या विविध योजनेतील प्रकरणे मंजूर करून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी व भेसळ माल देणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT