Hingoli News 
मराठवाडा

Hingoli News : हंगामापूर्वीच उडीद, मूग हातचे जाणार? येत्या तीन-चार दिवसांतच करावी लागणार पेरणी

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : जून महिना कोरडा गेला. जुलै सुरू झाला. पण, अजूनही अपेक्षित पाऊस आला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाने हुलकावणी दिल्याने अनेकांच्या शेतात पिकांऐवजी ढेकळेच दिसत आहेत. जूनमध्ये पाऊस पडलेला नाही. परिणामी, उडीद-मुगाच्या पेरणीवर परिणाम होणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत पेरणी न झाल्यास उडीद-मुगाचा पेरा करता येणार नाही.

जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. त्यात प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, सोयाबीन, कापूस आदी पिके घेतली जातात. रोहिणी नक्षत्रात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. उन्हाची तीव्रताही वाढली आहे. पावसाने हजेरी न लावल्याने खते, बियाण्यांच्या बाजारातील उलाढाल मंदावली आहे. दुकानदारांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे.

शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी करण्यासाठी आवश्यक ओलावा जमिनीमध्ये नसल्याने पेरणीचा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली नाही.

सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी या पिकांची पेरणी होते. गेल्या दोन वर्षांत तूर, सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मूग उडीद ही खरिपातील प्रमुख पिके आहेत. मात्र, पाऊसच न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पाऊस सुरू‎ झाल्यास इतर पिकांच्या पेरणीलाही जोर‎ येईल. दरम्यान, ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होते‎ व १५ दिवसांच्या या नक्षत्रात कमी-अधिक‎ पाऊस पडतो. यामुळे खरीप लागवडीची‎ लगबग सुरू होते. मात्र, यंदा मृग नक्षत्रच‎ कोरडे गेले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. यंदा कोरडा दुष्काळ पडतो की काय,‎ याची चिंता सतावू लागली आहे.

हवामान खात्याकडूनही नवनवीन अंदाज वर्तवले जात आहेत. यामुळे पाऊस लांबणार पण‎ कधीपर्यंत, याचे ठोस उत्तर मिळत‎ नसल्यामुळे शेतकरी चिंतीत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागातील‎ जाणकारांकडून शेतकऱ्यांना १०० मिमी पाऊस ‎ झाल्यावरच पेरणी करा, असा सल्ला दिला‎ जात आहे.‎

खरिपातील मूग आणि उडीद या पिकांची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यादरम्यानच करावी लागते. त्यानंतर पेरणी केली‌ तर उत्पादनात घट येते. त्यामुळे या पिकांची ८ ते १० जुलैपर्यंतच‌ पेरणी केली जाते. यंदा पाऊस लांबल्याने आता मूग, उडिदाऐवजी सोयाबीन पेरणी करावी.

- शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT