korona 
मराठवाडा

हिंगोलीत एका कोरोनाबाधिताची भर, संख्या पोचली १८३ वर

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शहरातील रिसाला बाजार भागातील एका ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी (ता.दोन) रात्री प्राप्त झाला. तसेच पोटा शेळके (ता. औंढा नागनाथ) येथील एका कोरोनामुक्त रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात एकूण १८३ रुग्ण झाले असून त्यातील १०६ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आठ, सेनगाव १२, हिंगोली २९, वसमत १२, जिल्हासामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात औंढा पाच, सूजखेडा एक, सामुदाय आरोग्य अधिकारी एक, पहेणी चार, माझोड एक, चोंढी खुर्द एक, बाराशिव दोन, रिसाला बाजार एक असे एकूण ७७ रुग्ण उपचार घेत आहेत. 

दोन हजार ३४८ संशयितांना भरती

दरम्यान, आतापर्यंत दोन हजार ३४८ संशयितांना भरती करण्यात आले होते. यातील दोन हजार सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एक हजार ९५५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ३८१ संशयित भरती आहेत. 

७७ रुग्णांवर उपचार सुरू 

यापैकी २३६ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित १८३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १०६ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

होमिओपॅथिक औषधींचे मोफत वाटप

पोतरा : कळमनुरी तालुक्‍यातील पोतरा येथील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. प्रेमेंद्र बोथरा यांच्यातर्फे मंगळवारी (ता.दोन) घरोघरी मोफत कोरोना प्रतिकारक होमिओपॅथिक औषधींचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आपापल्या परीने अनेक जण गरजूंना मोफत धान्य, किराण किटचे वाटप करीत आहेत. 

ग्रामस्थांची उपस्थिती

यात पोतरा येथील भूमिपुत्र तसेच होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. प्रेमेंद्र बोथरा यांनी पोतरा गावात सहा ते साडेसहा हजार ग्रामस्थांना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिकारक होमिओपॅथिक औषधींचे वाटप केले.या वेळी सरपंच ज्‍योती रणवीर, माजी सरपंच रघुनाथ मुलगीर, श्रीकांत मुलगीर, विजय मुलगीर, पोलिस पाटील श्रीमती मारकोळे, सोपान रणवीर, देवानंद मुलगीर, भाऊराव खुडे, ग्रामसेवक आर. डी. कुलकर्णी आदींची उपस्‍थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway In Maharashtra : साताऱ्याच्या दुष्काळी मातीला येणार सोन्याचे दिवस! 'या' 3 तालुक्यांचा चेहरामोहरा बदलणार; जाणून घ्या काय आहे मेगा प्लॅन?

Government Job: SSC CGL 2026 नोटिफिकेशन जारी! 12,256 जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या परीक्षा तारखा ते अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात दऱ्याचे वडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा

Daund Manmad Railway: दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाचा फटका; सोलापूर विभागातील गाड्या तासन्तास उशिराने, सोलापूर विभागातील रेल्वे वेळापत्रक कोलमडले

Raigad: रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद राहणार, प्रशासनाचा मोठा निर्णय, कधी आणि का?

SCROLL FOR NEXT