file photo 
मराठवाडा

हिंगोली : पांगरा शिंदे गावात परत आला जमीनीतुन गुढ आवाज, वापटीत भिंत कोसळली

राजेश दारव्हेकर

हिंगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात शनिवारी (ता. ३०) दुपारी ३. २५ व ४. १० वाजता एका पाठोपाठ दोन वेळेस जमीनीतुन गुढ आवाज आला. हा आवाज कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावात आला आहे. या हादऱ्याने वापटी गावात भिंत कोसळली आहे. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या अनेक वर्षांपासून जमीनीतुन गुढ आवाज येत आहेत. आतापर्यंत शंभर वेळा हे आवाज आले आहेत. एक ते दोन वेळेस या गावात भुकंपाचा सौम्य धक्का बसल्याची रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. या बाबत गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी कळविले आहे. एकदा येथे स्वारातीम विद्यापीठ नांदेड येथील तज्ञांनी भेट देऊन पाहणी केली मात्र आवाजाचे गुढ उकलले नाही. रात्री बेरात्री होणाऱ्या या आवाजाने गावकरी भयभीत झाले आहेत. 

दरम्यान, या गावात आवाज आल्यावर कळमनुरी व औंढा तालुक्यातील काही गावात आवाज येत आहेत. शनिवारी दुपारी ३. २५ व ४. १० असे दोन वेळेस आवाज झाले. यामुळे घरातील गावकरी रस्त्यावर आले होते. गावात कोठे काही झाले का याची विचारपुस एकमेकांना करीत होते. मात्र पांगरा गावात काही नुकसान झाले नाही.

परंतु या आवाजाने याच तालुक्यातील वापटी गावात श्री. तवर यांच्या घराची भिंत कोसळली आहे. तर हा गुढ आवाज वापटीसह कुपटी शिरली, खापरखेडा, खांबाळा तसेच औंढा तालुक्यातील आमदार परिसरात झाल्याचे गावकरी सांगत आहेत तसेच कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, पोतरा आदी गावात देखील हा आवाज आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. याची प्रशासनाने दखल घेऊन आवाजाचे गुढ उकलावे अशी मागणी होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: गौतम गंभीरचं पद धोक्यात? 'या' अनुभवी खेळाडूला ऑफर; कसोटी संघासाठी BCCIचा ‘प्लॅन B’ तयार!

मिर्झापूर ते रक्तांचल: 'या' सीरिजच्या तीनही सीझनने घातला धुमाकूळ; आता चौथ्या सीझनची उत्सुकता; तुम्ही कुठल्या सीरिजची वाट पाहताय?

Pune News : आता दस्त क्रमांकाच्या आधारे मिळणार कर्ज; नोंदणी ‘ई-प्रमाण’ प्रणालीवर करण्याचा विचार

एक 'विग' ठरलं वादाचं कारण! 'दृश्यम 3' नाकारल्याने निर्माते अक्षय खन्नाला नोटीस पाठवणार, टीका करत म्हणाले, 'यश त्याच्या डोक्यात...'

Water Supply : सूस, म्हाळुंगेचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; मुळशीतून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला राज्याची तत्त्वतः मान्यता

SCROLL FOR NEXT