file photo 
मराठवाडा

हिंगोली : ट्रक- दुचाकीच्या अपघातात दोन ठार, चुंचा येथील घटना 

मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा ( जिल्हा हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथून जाणाऱ्या नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्ग बायपासवर ट्रक- दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. ३०) दुपारी घडली.

याबाबत  माहिती अशी की वारंगा फाटा येथून जाणाऱ्या नागपूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग बायपासला दुचाकी व ट्रक चा भिषण अपघात होऊन  चुंचा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. वारंगा फाटा येथून जवळच असलेल्या चूंचा येथील तुकाराम  काळे वय ६० वर्ष, रावसाहेब  लोमटे वय ४८ हे  दोघे दुचाकीवरून वारंगाफाटा येथे येत होते.  त्यांच्या पाठी मागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एम एच ३४ ए बी ९२८१ जोरदार धडक दिली या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला .

हा अपघात इतका भीषण होता की  मोटरसायकल ट्रकसोबत फरफटत दोनशे फुटापर्यंत गेली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, फौजदार हनुमंत नखाते, शेख बाबर, अर्षद पठाण, आदींनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी बाळापूर येथे पाठविण्यात आले आहे.  या बाबत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मयत तुकाराम काळे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. तर रावसाहेब लोमटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

 

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT