hingoli photo 
मराठवाडा

हिंगोलीत ‘एसआरपीएफ’चे आणखी दोन जवान कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील जिल्‍हा सामान्य रुग्णायातील आयसोलेशन वार्डात उपचार घेणारे दोन एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त झाल्याने त्यांना गुरुवारी (ता. १४) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यात हिंगोली येथील एक जवान व जालना येथील एका जवानाचा समावेश असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्राद श्रीवास यांनी दिली.

जिल्‍ह्यात आतापर्यंत ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्‍यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ४३ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

नऊ जवानावर औरंगाबाद येथे उपचार

 यातील ४२ बाधित रुग्ण हे एसआरपीएफ जवान असून, एक रुग्ण जिल्‍हा रुग्णालयातील परिचारिका आहे. जिल्‍हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्‍थिर असून कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. तसेच यातील एसआरपीएफच्या नऊ जवानावर औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

२१ संशयितांचे अहवाल प्रलंबित

 दरम्यान, आतापर्यंत आयसोलेशन वार्ड व जिल्‍ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण एक हजार ४१८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्‍यापैकी एक हजार ३०७ व्यक्‍तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे यातील एक हजार २८० व्यक्‍तींना डिस्‍चार्ज दिला असून सध्या १२९ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २१ संशयितांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे परिश्रम

जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. येथील रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याने कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याने जिल्हा प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

जवानांच्या चेहऱ्यांवर हास्य

कोरोनाबाधित एसआरपीएफच्या काही जवानांनी गैरसोय होत असल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त केली होती. तर काही जवान डॉक्टरांना प्रतिसाद देत नसल्याचा तसेच परिचारीकांना धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 

पालकमंत्र्यांनी घेतली होती भेट

पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी एसआरपीएफच्या जवानांशी संवाद साधत सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच प्रशासनालाही सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गतीमान होत विविध उपाययोजना केल्या. आता प्रशासन व आरोग्य विभाग गतीमान झाला असून जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे चालली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT