file photo 
मराठवाडा

हिंगोली : आयटकचे जिल्हाकचेरीसमोर कामबंद आंदोलन, काय आहे कारण? 

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  आशा वर्कर यांना दोन हजार रुपयांचे वाढीव मानधन देऊन, गट प्रवर्तकांना कोरोना काळात सर्व्हेक्षण केलेले तीनशे रुपये भत्ता तातडीने खात्यात जमा करावा, अशा विविध मागण्यासाठी राज्यउपाध्यक्ष मुगाजी बुरुड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कचेरीसमोर बुधवारी (ता. १४) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.

यापूर्वी वेळोवेळी आशा व गट प्रवर्तक यांना मानधन वाढीसाठी व कायमस्वरूपी करण्यासाठी अनेक वेळा मोर्चे काढले, आंदोलन केले परंतू जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन यापूर्वी दिले होते. मात्र ते न पाळल्याने अखेर नाईलाजाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊन ठेपली असल्याचे मुगाजी बुरुड यांनी सांगितले. यामध्ये अनेक मागण्या असून एकाही मागणीचा गांभीर्याने विचार झाला नाही, त्यामुळे आशा वर्कर यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. 

आशा स्वयंसेविका यांचा जीव धोक्यात घालत आहेत

तसेच जिल्हासमन्वयक, तालुका समन्वयक, संघटक यांना तीस हजार रुपये मानधन दयावे, अंगणवाडीच्या धर्तीवर आशा कार्यक्रम स्वतंत्र राबविण्यात यावा, शहरी आशा स्वयंसेविका यांना तीन ते चार महिन्यापासून कामाचा मोबदला मिळाला नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याशिवाय शहरी आशा वर्कर मध्ये गटप्रवर्तक यांची नेमणूक करावी, माझे कुटुंब माझी जबाबदारी ऍपमध्ये माहिती भरण्यासाठी आशा वर्कर यांना प्रशिक्षण दिले नसल्याने माहिती कशी भरावी असा प्रश्न पडला आहे, तर टी शर्ट, हॅन्ड ग्लोव्हस, बॅच, मास्क, सानिटायझर व इतर साहित्य अद्याप दिले नाहीत त्यामुळे आशा स्वयंसेविका यांचा जीव धोक्यात घालत आहेत. 

आंदोलनात यांचा होता समावेश 

कोरोना काळात आरोग्य विभाग पैसे कुठे खर्च आहेत काही कळायला मार्ग नाही. आरोग्य विभाग साहित्य खरेदी करते. पण ते साहित्य नावालाच की, काय असा प्रश्न पडला आहे. साहित्य खरेदी केले असेल तर आशा स्वयंसेविकाना का दिले जात नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. अशा अनेक मागण्याचा यात समावेश आहे. या मागण्या सोडविल्या नाहीतर यापुढे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुगाजी बुरुड यांनी दिला आहे. या कामबंद आंदोलनात राज्य संघटक नामदेव भिसे, राज्य प्रसिद्धी प्रमुख सुधाकर वाढवे ,सुनीता कुरवाडे, वंदना पाईकराव, सारिका चांदणे, वैशाली गरड, बाबाराव अवरगाडे ,पांडुरंग कस्तुरे, रेखा कदम आदी सहभागी झाले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT