file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोलीच्या सनी पंडितची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील क्रिकेटपटू सनी पंडित यांची बडोदा येथे १० जानेवारीपासून होणाऱ्या मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

हिंगोली येथील सनी पंडित यांने यापूर्वीही रणजी ट्रॉफी राज्यातील स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवून दिली आहे. बडोदा येथे होणाऱ्या मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड  करण्यासाठी राज्यभरातून ६० खेळाडू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे यांनी पुण्यात बोलवले होते. 

मागील पंधरा दिवसापूर्वी या खेळाडूंचे सराव शिबिर झाले. त्यातून वीस जणांच्या संघाची निवड झाली आहे. यामध्ये हिंगोलीच्या सनी पंडित यांचा समावेश आहे. कोविडमुळे वाढीव पाच खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा संघ ता. १ जानेवारी रोजी बडोदा येथे पोहचणार आहे. बडोदा येथे ता. १० जानेवारी ते ता. २५ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सहा राज्यातील संघ सहभागी होणार आहे. 

दरम्यान, सनी पंडित याने आतापर्यंत अनेक स्पर्धेत भाग घेतला असून त्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. शालेय स्पर्धेत सहभागी होत त्याने क्रिकेट स्पर्धाना सुरुवात केली आहे. महाविद्यालयात असताना त्याने विविध स्पर्धेत सहभागी होत यश संपादन केले आहे. या खेळाची आवड असल्याने तो सतत खेळत गेला व यश मिळत गेले. आता त्याची निवड बडोदा येथे होणाऱ्या स्पर्धेत राज्याच्या संघात झाली आहे. 

सनी पंडित यांच्या निवडीबद्दल शामकांत देशमुख, शेख रशीद, संतोष लोंढे यांच्यासह हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT