geet 
मराठवाडा

Video : हिंगोलीतील फाग मैफलीत होळी गीतांची धूम 

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः धुलीवंदनाची बच्चे कंपनीसह मोठी मंडळीही आतुरतने वाट पाहताहेत. फाल्‍गुन महिण्यानिमित्त शहरातील उत्तर भारतीय बांधवांतर्फे गोलदाज गल्‍ली, साहू गल्‍ली, सातमाता मंदिर, दुधाधारी मंदिरात आयोजित फाग मैफलीत रंगोत्‍सवाची धामधूम सुरू आहे.

उतर भारतात फाल्‍गुन महिण्यात रंगोत्‍सवानिमित्त गीतांच्या मैफली रंगतात. (ता.२४) फेब्रवारीपासून फाल्‍गुन महिणा सुरू झाल्यापासून रंगपंचमीपर्यंत होळीचा सण मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. हा सण वसंत ऋतूत येतो. या महिण्यात झाडांना नवी पालवी फुटते. फाल्‍गुन महिण्याचे महत्‍व वेगळे असल्याने फाग महोत्‍सवात होळी गीते सादर करण्याची पंरपरा आहे. 

या ठिकाणांवर फाग गिताची धुम
शहरात उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येने राहतात. दरवर्षी समाजातर्फे फाग महोत्‍सव साजरा केला जातो. यंदाही वसंत पंचमीपासून शहरातील विविध मंदिरात या मैफली सुरू आहेत. यात कालीमाता मंदिर, दुधारीमाता मंदिर, सातमाता मंदिर, जलेश्वर मंदिर, गोलंदाजगल्‍ली आदी ठिकाणी फाग गिताची धुम सुरू आहे. यात आनंद भजनी मंडळ, खाकीबाबा भजनी मंडळ, तुलसी मानस मंडळ, गुरूवार भजनी मंडळ आदी मंडळे गिते सादर करीत आहेत. शहरातील गाडीपुरा भागातील कालीमाता मंदिरात महंत खुशालदास महाराज यांच्या पुढाकारातून रिसाला बाजारातील गुल भजन मंडळातर्फे बुधवारी फाग गितांची मैफिल रंगली होती.   

अशी आहेत फाग गीते
अबीर गुलाल को रंग बना है
वो तो सोने की पिचकारी
हाथ पिचकारी होली खेलत 
अवध बिहारी हाथ पिचकारी 

मचाई मचाई बिरजमे हरी होली मचाई
होली खेले रघुवीरा अवध मे होली खेले रघुवीरा, 
आज बिरजमे होली रे रसिया
तसेच अबीर गुलाल को रंग बना है
वो तो सोने की पिचकारी
हाथ पिचकारी होली खेलत
अवध बिहारी हाथ पिचकारी
यासह आज बिरजमें होली रे रसीयॉ
होली रे होली, बरजोरीरे रसीयॉ

ठेका धरत नागरिकांचा सहभाग
यासह ‘रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे’ आदी गीतांचा समावेश आहे. शहरातील नागरिक यावर ठेका धरत उत्‍स्‍फुर्त सहभाग नोंदवत आहेत. यात भरत पहेलवान, गणेश साहू, विशाल जैस्‍वाल, सुनील साहु आदींचा समावेश आहे. कालीमाता मंदिरात सायंकाळी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करीत गिते सादर करण्यात आली. यात गुल भजनी मंडळाचे प्रमुख भगीरथ यादव, जगन भगत यांच्यासह बिरजू यादव, धम्‍मुलाल यादव, बाबुलाल यादव, रामा यादव, इंदरचंद यादव, सोनू यादव, पवन यादव, राजू 
यादव आदी सहभागी झाले आहेत.    

युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग
उत्तर भारतीय समाजात वसंत पंचमीपासून रंगपंचमीपर्यंत होळीचा सण मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. फाग गिते सादर केली जातात. त्‍याची परंपरा शहरात अनेक वर्षांपासून जपली कायम असून यात आता युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. - गणेश साहु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT