परभणी ः ख्रिसमसनिमित्त शहरातील दत्त नगरातील जॉन पिटर मकासरे यांच्या घरी प्रभु येशु ख्रिस्त जन्माचा देखावा तयार करण्यात आला आहे.
परभणी ः ख्रिसमसनिमित्त शहरातील दत्त नगरातील जॉन पिटर मकासरे यांच्या घरी प्रभु येशु ख्रिस्त जन्माचा देखावा तयार करण्यात आला आहे. 
मराठवाडा

घरी तयार केला ‘प्रभु येशु ख्रिस्त’ जन्माचा देखावा 

कैलास चव्हाण

परभणी ः प्रभु येशू ख्रिस्तांच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना म्हणजेच ख्रिसमस आहे. बुधवारी (ता.२५) नाताळ हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. परभणी शहरातील सर्व चर्चवर यासाठी रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिश्चन धर्मातील नाताळ अर्थात ‘प्रभु येशू ख्रिस्तां’चा जन्मदिवस हाच सर्वात मोठा सन आहे. म्हणून दरवर्षी ता.२५ डिसेंबर हा ख्रिसमस (नाताळ) म्हणून साजरा केला जातो. ख्रिस्त अनुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. 

अशी करतात तयारी
परभणी शहरात आठवडाभरापासून आधीच तयारी केली जाते. चर्चची रंगरंगोटी करुन त्यांना सजवले जाते. चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवीन कपड्यांची खरेदी करून एकमेकांसाठी भेटवस्तु खरेदी करण्यात येतात. 

नाताळची तयारी जोरात सुरू

(ता.२४ व २५) डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्यादिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांची गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ‘ख्रिसमस ट्री’ सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना लावली जातात. यंदा मागील काही दिवसांपासून परभणी शहरातील ख्रिश्चन बांधवांकडून नाताळची तयारी जोरात सुरू आहे. 

या चर्चमध्ये केली रंगरंगोटी
नारायण चाळ, सरफराज नगर, पोस्ट कॉलनी, परसावत नगरातील चर्चमध्ये रंगरंगोटी करण्यात आली आहे. बुधवारी यानिमित्त विविध कार्यक्रम चर्चमध्ये पार पडणार आहेत.

या दिवसाचे महत्व
हा दिवस म्हणजे अंजिक्य सुर्याचा अर्थात येशू ख्रिस्तांचा वाढदिवस. न्यायाचा सुर्य आणि जगाचा प्रकाश आहे. गाईच्या गोठ्यात जन्म घेऊन पाप, अन्याय आणि अंशातीच्या अंधकाराचा नाश करुन दीन-दलितांचे जिवन तारणाऱ्या प्रकाशाने उजाळुन जगाला प्रेम, दया आणि शांतीची शिकवण देणाऱ्या प्रभु ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस म्हणून साजरा होतो. 

गव्हाणीला आहे महत्व
ख्रिसमस निमीत्त पुर्वसंध्येला ख्रिच्चन बांधवांच्या घरोघरी प्रभु येशु ख्रिस्त जन्माचा देखावा अर्थात गव्हाण तयार करण्यात येते. मनमोहक पध्दतीने सजविलेली गव्हाण पाहण्यासाठी मोठी गर्दी असते.

नाताळ सणानिमित्त हिंगोलीतील चर्चमध्ये जय्यत तयारी
हिंगोली शहरातील शास्‍त्रीनगर भागात असलेल्या सेक्रेट हार्ट इंग्‍लिश स्‍कूल शाळेच्या मैदानावर ब्रिटिशकालीन चर्च आहे. येथे ख्रिस्‍तीबांधव प्रार्थनेसाठी येतात. बुधवारी (ता. २५) नाताळ सणानिमित्त या चर्चमध्ये ‘बाळ येशू’चा जन्मोत्‍सव साजरा केला जाणार असून त्‍याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 

सेक्रेट हार्ट इंग्‍लिश स्‍कूल शाळेत ब्रिटिशकालीन चर्च
शहरातील शास्‍त्रीनगर भागात असलेल्या सेक्रेट हार्ट इंग्‍लिश स्‍कूल शाळेत ब्रिटिशकालीन चर्च आहे. ब्रिटिशांनी हा चर्च औरंगाबाद धर्मप्रांताकडे देखभालीसाठी दिला. तेंव्हापासून या चर्चची देखभाल औरंगाबाद येथील धर्मगुरू करतात. येथे दर शुक्रवारी व रविवारी होणाऱ्या प्रार्थनेसाठी मोठ्या प्रमाणावर ख्रिस्‍ती बांधव येतात. दरवर्षी नाताळनिमित्त येथे आकर्षक सजावट करून येथे असलेल्या बाळ येशूचा जन्मोत्‍सव साजरा केला जातो. या वेळीदेखील चर्चमध्ये रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT