file photo 
मराठवाडा

स्वच्छतागृहाच्या बांधकामास प्रवृत्त करणाऱ्यांनाही मानधन !

कैलास चव्हाण

परभणी : जिल्ह्यातील स्वच्छतागृह बांधकामाचे शिल्लक उद्दिष्ट ता. ३१ डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर लाभार्थींना स्वच्छतागृह बांधकाम करण्यास प्रवृत्त, प्रोत्साहित करणाऱ्यांनाही व बांधकाम जबाबदारीने पूर्ण करून घेईल, अशा व्यक्तीला जिल्हा परिषदेकडून प्रतिस्वच्छतागृह दीडशे रुपये एवढे मानधन मिळणार आहे. मानधन देण्याची संकल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या बाबत सर्व गटविकास अधिकारी, सर्व विभागाचे विस्तार अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ४९ हजार ४०७ स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे अपेक्षित आहे. यामध्ये बऱ्याच नागरिकांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम केले आहे. परंतु, पंचायत समिती मार्फत मिळणारे १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव सादर केलेला नाही. तसेच सन २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या लाभार्थी असलेली २१ हजार ९३० एवढे कुटुंब नव्याने ऑनलाइन करण्यात आली आहेत.


स्वच्छतागृह बांधकाम करणे आवश्यक
अशा शिल्लक राहिलेल्या कुटुंबांना सद्यःस्थितीमध्ये स्वच्छतागृह बांधकाम करणे आवश्यक आहे. या कुटुंबांना पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागांचे विस्तार अधिकारी यांच्या मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या आशाताई, अंगणवाडीताई, स्वच्छग्रही, नागरिकांना स्वच्छतागृह बांधकामासाठी प्रोत्साहित करेल, अशा व्यक्तींना सदरचे मानधन देण्यात येणार आहे. गावस्तरावर स्वच्छतागृह बांधकामास प्रवृत्त असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. करडखेलकर यांनी केले आहे.

शिल्लक निधी
परभणी  ७ कोटी ९८ लाख ३२ हजार ९६२, गंगाखेड ३ कोटी ४४ लाख १४ हजार ३२६, मानवत ३ कोटी ७८ लाख २७ हजार ५८६, पाथरी ३ कोटी २३ लाख ५७ हजार २७२, पालम ४ कोटी ९२ लाख ७२ हजार ०२, सोनपेठ २ कोटी ९१ लाख १९ हजार ५३, सेलू  २ कोटी ४८ लाख ६८ हजार २१३, जिंतूर ६ कोटी २८ लाख ९ हजार ८५२, पूर्णा २ कोटी ४१ लाख ५६ हजार १४९, एकूण -३६ कोटी ६४ लाख ५० हजार ३१५
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार पुन्हा घसरला! RBIच्या निर्णयाआधी गुंतवणूकदार सावध; युद्धाच्या काळातही Godrej शेअर तेजीत

Imran Syed Firing Video : छत्रपती संभाजीनगरात दहशत! शिव्या देत हवेत गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड इम्रान सय्यदचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय करतोय?

Latest Marathi News Live Update : गोराई बीचवर बेकायदेशीर घोडागाडी आणि बैलगाडी शर्यतीचा प्रकार उघड

Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात घरगुती गॅसचे ४,३५५ सिलिंडर शिल्लक; पेट्रोल व डिझेल पुरवठा सुरळीत

SCROLL FOR NEXT