Horse Dancing Competition In Hingoli  esakal
मराठवाडा

Hingoli Update : हिंगोलीत रंगली अश्वनृत्य स्पर्धा, शेकडो अश्व दाखल

हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ढोल-ताशांच्या गजरामध्ये अश्व थिरकताना बघायला मिळतात.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोलीच्या रामलीला मैदानावर अश्वनृत्य स्पर्धा रंगली. मंगळवारी (ता.चार) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. आतापर्यंत ढोल-ताशाच्या गजरावर, नृत्यावर पुरुष, महिला, मुली, मुल, वृद्ध थिरकताना बघितले आहेत. मात्र हिंगोलीच्या (Hingoli) रामलीला मैदानावर ढोल-ताशांच्या गजरामध्ये अश्व थिरकताना बघायला मिळतात. घोड्यांचा हा डान्स बघून नागरिक सुद्धा भारावून गेले आहेत. कार्तिक महोत्सव सेवा समितीच्या वतीने एकचक्रा नगरी येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंती निमित्ताने अश्व नृत्य स्पर्धेचे (Horse Dancing Competition) आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यामधून अश्व प्रेमी हिंगोली दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या काही अश्‍वांनी आपले नृत्य सादर केल्याच्या नंतर उपस्थित भारावून गेले आहेत.(Horse Dancing Competition Starts In Hingoli)

ही स्पर्धा तीन दिवसीय आहे. प्रथम पारितोषिक ५१ हजार रूपये, द्वितीय पारितोषिक ४१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ३१ हजार रुपये, चौथे पारितोषिक २१ रुपये आणि पाचवे पारितोषिक ११ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, आयोजक अशोकराव नाईक यांच्या हस्ते झाले. स्पर्धे दरम्यान बाजेवर थिरकणारे घोडे, परातीवर थिरकणारे घोडे, उंच उड्या मारणाऱ्या अशा विविध प्रकारे घोड्यांचा नाद खुळा डान्स हिंगोलीकरांना अनुभवायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT