File photo 
मराठवाडा

नैसर्गिक प्रसूतीसाठी ‘हे’ रुग्णालय आहे अग्रेसर  

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शासकीय रुग्णालय लहान असो वा मोठे; आलेल्या गर्भवती मातेची कितीही काळजी घेतली गेली तरी, त्याची कुणी दखल घेत नाही. उलट थोडे फार कमी जास्त झाले तर मात्र रुग्णालयातील डॉक्टर्सच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात येतात. मात्र याच शासकीय रुग्णालयात गेल्या वर्षभरात कमीत कमी सिझेरीअन आणि जास्तीत जास्त नैसर्गिक प्रसूती करण्यावर भर देत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.  

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या वर्षभरात दहा हजार ७११ गर्भवती मातांपैकी सात हजार ८५६ मातांची नैसर्गिक प्रसूती करुन वेगळेपणा सिद्ध केले आहे. यातील दोन हजार ८५५ इतक्या महिलांचे सिझेरीअन करण्यात आले. त्यामुळे विष्णुपुरीचे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय हे मातेसाठी आणि बाळासाठी वरदान ठरले आहे. विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात जिल्ह्यासह अजुबाजुच्या तेलंगणा, आंध्रासह हिंगोली, वाशिम, परभणी, वसमत आदी ठिकाणांहून गर्भवतीमाता प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे रुग्णालयात दिवसाला ३५ ते ४० नैसर्गिक प्रसूती होते तर, सहा ते आठ महिलांची सिझेरीअन होते.

मेडीकल कॅन्सिल आॅफ इंडियाच्या मान्यतेनुसार रुग्णालयास ९० खाटांची मान्यता आहे. मात्र रुग्णालयात रोज येणाऱ्या गर्भवती मातांची संख्या बघता रुग्णालय प्रशासनाने १०६ खाटा तयार केल्या आहेत. तरीही खाटांची संख्या कमीच पडते आहे. त्यामुळे अजून दोन वॉर्डाची निर्मिती होणे अपेक्षित आहे. सध्या चार वॉर्ड असून, एका वॉर्डात ३० ते ३५ बेड आहेत. यासाठी एक प्रसूतीतज्ज्ञ विभागाप्रमुख प्राध्यापक, दोन सहयोगी प्राध्यापक, पाच सहाय्यक प्राध्यापक यासह १३ निवासी डॉक्टर्स तर, एका वॉर्डात सहा ते आठ नर्स असा कर्मचारीवर्ग सद्यस्थितीत आहे.  

 नैसर्गिक प्रसुतीसाठीच प्रयत्न 
अतिशय कमीत कमी मनुष्यबळाच्या जोरावर अधिष्ठाता डॉ. चंद्रकुमार म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती विभागाची टीम काम करत आहे. जिल्हाच नव्हे तर, नांदेड जिल्ह्याच्या सिमावर्तीभागातुन आलेल्या गर्भवती मातेची सुलभ आणि नैसर्गिक प्रसूती कशी करता येईल यावर आम्ही भर देतो.
- डॉ. एस. आर. वाकोडे (प्रसूती विभाग प्रमुख)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT