Latur News
Latur News 
मराठवाडा

आगीत जळालं घर, दारापुढची म्हैस होरपळून दगावली... 

सकाळ वृत्तसेवा

लातूर : उदगीर तालुक्यातील हेर येथे शुक्रवारी (ता.27) रात्री दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घरासमोर बांधलेली एक म्हैसही आगीत होरपळून दगावली आहे.

हेर गावातले रहिवासी संतोष सोपान सुर्यवंशी, शितल सुर्यवंशी, भक्ती सुर्यवंशी, पुनम सुर्यवंशी, महारूद्र सुर्यवंशी हे सर्व जण राञी जेवण करून अंगणात झोपी गेले. रात्री बाराच्या सुमारास वादळ, सोसाट्याचा वारा सुटला होता. तेव्हा या वादळवाऱ्यात अचानक घराला आग लागली व जोराचा वारा असल्याने ती चांगलीच भडकली.

या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य, घरातील सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी, गहू, दाळी, कपडे, नगदी रक्कम आठ हजार, चाळीस पत्रे, एक तोळा सोने, शिलाई मशीन, हे काही वेळेतच जळून खाक झाले. तसेच घरासमोर बांधलेली एक 70 हजार रुपये किंमतीची म्हैसही दगावली आहे. म्हशीची पाहणी पशु पर्यवेक्षक नारायण मुळे यांनी सुर्यवंशी यांच्या घरी जाऊन केली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या आगीत सुर्यवंशी यांचे एकंदरीत तीन लाखाचे  नुकसान झाले आहे. पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी पंडीत जाधव, कनिष्ठ अभियंता सतिष जाधव, पशुधन पर्यवेक्षक नारायण मुळे, तंटामुक्तती अध्यक्ष बळवंत घोगरे, पोलीस पाटील एकनाथ कसबे, भागवत गुरमे, गोविंद कोंपले, धनाजी माटेकर, प्रभु हुडगे, राजकुमार तवंडे, अविनाश सुर्यवंशी आदी पंचनामा करण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी गावातील नागरिक भागवत गुरमे, राजकुमार तवंडे, विलास कांबळे, मंडळ अधिकारी पंडित जाधव यांच्या वतीने साडेतीन हजार रूपयांची मदत करण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नाही.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT