file photo 
मराठवाडा

‘या’ शहरातील शेकडो हातगाडे हटविले

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः कित्येक वर्षांनंतर शहर वाहतूक शाखेने नारायण चाळ ते नानलपेठ मार्गावरील शेकडोच्या संख्येने रस्त्यावर दुतर्फा असलेले हातगाडे हटवून धाडसी कारवाई केली. या कारवाईमुळे रस्त्यावरील रहदारी तर सुरळीत झालीच; पण या परिसराने मोकळा श्वास घेतला. लगेचच या हॉकर्सनी दबाबतंत्र सुरू केल्याची माहिती आहे. ही कारवाई औटघटकेची ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

परभणी शहरातील सर्व बाजारपेठेतील रस्ते अतिक्रमणांनी व्यापलेले आहेत. शेकडोंच्या संख्येने हातगाडे, रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे रहदारीला प्रचंड अडथळा निर्माण होतो.
नागरिकांना जाणे-येणेदेखील मुश्कील होते. परंतु, महापालिका व शहर वाहतूक शाखेच्या वरदहस्ताने फारशी कारवाई होत नव्हती. 
जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश शहर वाहतूक शाखेला दिल्यानंतर पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नियंत्रणाखाली गुरुवारी (ता. १२) या हॉकर्सना रस्त्यावर गाडे थांबविण्यास मज्जाव करण्यात आला. महापालिकेचे महात्मा फुले भाजी मंडई रिकामी असून त्या ठिकाणी जागा घेऊन व्यवसाय करण्याच्या सूचनादेखील त्यांना देण्यात आल्या. नारायण चाळपासून नानलपेठ कॉर्नरपर्यंत आर.आर. टॉवर, अष्टभूजा देवी मंदिर, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक आदी भागातील हातगाडे हटविण्यात आले.


स्थानिकांबरोबरचा वाद भोवला...
या परिसरात स्थानिक व हातगाडेवाल्यांमध्ये जागेवरून नेहमीच वाद होतात. असाच वाद झाल्यानंतर एका स्थानिकाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती असून त्यामुळे ही कारवाई झाल्याचे समजते. वास्तविक पाहता रस्त्यावरील रहदारीतील अडथळे दूर करण्याचे काम शहर वाहतूक शाखेचे आहे. परंतु, शहर वाहतूक शाळा महापालिकेकडे, तर महापालिका शहर वाहतूक शाखेकडे बोट दाखवून कारवाई करताना दिसून येत नाहीत. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचीदेखील नेहमीच चर्चा होते. परंतु, आता लेखी तक्रारीनंतर ही कारवाई झाली आहे. ही कारवाई औटघटकेची ठरू नये, अशी अपेक्षा असून जेणेकरून शहर वाहतूक शाखेची पत, प्रतिष्ठा शाबूत राहील. चार दिवसांत परिस्थिती जैसे थे झाली तर यामध्ये मांडवली झाल्याचे चित्र निर्माण होईल.

पालिकेचे हॉकर्स झोन कागदावरच..
महापालिका चार वर्षांपासून हॉकर्स झोन तयार करण्याचे काम करीत आहे. परंतु, ते अजूनही कागदावरच आहे. न्यायालयाचे आदेश असतांनादेखील हॉकर्स झोन न करता अतिक्रमणांना पालिकाच थारा देत असल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्यावरील व्यावसायिकांकडून कर वसूल केल्या जात असे. परंतु, पालिकेने तेदेखील बंद करून स्वतःचा आर्थिक स्त्रोत बंद केला आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या शहरातील सर्व जागांवर अतिक्रमणे थाटून हे अतिक्रमण धारक फुकटात कमाई करीत आहेत.

हॉकर्सचे दबावतंत्र सुरू...
शहर वाहतूक शाखेने कारवाई करताच या हॉकर्सनी दबाबतंत्राचा वापर सुरू केला आहे. महापालिकेत या हॉकर्स अनेक हितचिंतक आहेत. पालिकेचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, परंतु त्यांचे हित जोपसण्याचे काम ते सातत्याने करीत आले आहेत. अशाच हिंतचिंतकांमुळे डनलपरोड, ग्रॅन्ड कॉर्नर, मराठवाडा प्लॉट, शिवाजीनगर, कडबी मंडी येथील हटवलेली अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. या हितचिंतकांनी शहराच्या लाखो नागरिकांचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: सतर्कतेचा इशारा! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धोका; पण कुठे? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे सुखदा खांडकेकरला ऐकावे लागलेले टोमणे; मग अभिनेत्रीने ठरवून घेतला तो निर्णय

Pune Traffic Alert: आषाढी वारी पालखी आगमनादिवशी पुण्यात पालखी मार्गावरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद

Manchar Rain Update : आहुपेत ४०७ मिमी, भीमाशंकरमध्ये २९७ मिमी पाऊस; डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ

Ambegaon Heavy Rain : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले; ओढ्या, नाल्यांना पुर, शेतात रस्त्यावर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT