Nanded News 
मराठवाडा

वासुदेव कलावंतांवर आली उपासमारीची वेळ, कशी? ते वाचाच

प्रमोद चौधरी

नांदेड : राज्यात कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन केले आहे. यामुळे राज्यातील भटके विमुक्त समाजातील पारंपरिक लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्यांना पुरेसे अन्यधान्य, किराणा व आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

रामनामाच्या पारी
आली वासुदेवाची स्वारी
ज्याच्या बापाने केला धर्म
मुलगा जाणितो त्याचे वर्म
वासुदेवाच्या चिपळ्या चाळ
गळा माळी नि पायी घोळ
वासुदेवाचा घुमतो टाळ
सुखी राहतील तुमचे बाळ

गाण्यातून समस्या मांडण्याचे कसब
वासुदेव कलावंतांकडे सद्यस्थितीचे प्रश्न गाण्यातून लयबद्ध पद्धतीने मांडण्याचे कसब आहे. वासुदेव नुसते प्रश्न मांडून थांबत नाही तर तो त्याची उत्तरेदेखील सांगतो. तो त्याच्या वाडवडिलांकडून घेतलेले बाळकडू पुढील पिढीला सांगून हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा जोपासत आहे. वासुदेव नैतिक मूल्यांची पाठराखण करतो. वासुदेवाचे जगणे भटके आहे. त्याला गावोगावी मैलोन् मैल भटकतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

पूर्वी दानधर्म करण्याचा संस्कार होता. अलिकडे ही प्रथा लुप्त झाल्याने वासुदेव कलावंतांच्या समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.  शासनही त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने गुंतागुंतीच्या समस्यांतच त्यांना जीवन काढावे लागत आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन
वासुदेव समाजाच्या विविध मागण्यांसाठी भटक्या विमुक्त जाती, जमाती सेवा संघाचे अध्यक्ष सुनिल डोईजड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय-धंदे बंद पडले आहेत.

हातावर पोट असलेल्या वासुदेव, जोशी,  गोंधळी,  नित्यगणा ढोलकी पिंगला वाघ्या मुरळी, स्मशाजोगी, जोगी डकलवार, मदारी, बहुरूपी, नाथपंथी, डवरी गोसावी, भिल्ल व पारधी या आदिवासी प्रवर्गांतील निराधार लोकांना बिकट परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. 

मोफत धान्य, किराणा द्यावा
गेल्या अनेक वर्षांपासून छोटे मोठे कार्यक्रम करून उपजीविका करणाऱ्या या व्यक्तींकडील तुटपुंजी असलेली रसद संपली असून आता त्याची उपासमार होऊ लागली आहे. या महामारीचे संकट हजारो लोक उपासमार व आर्थिक टंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन या लोकांना राशन दुकानावर मोफत धान्य व किराणा उपलब्ध करून द्यावा.
- सुनिल डोईजड, अध्यक्ष (भटक्या विमुक्त जाती, जमाती सेवा संघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Beach Closed : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना बंदी! उदय सामंतांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून कडक पाऊल, अरबी समुद्रानं धारण केलंय रौद्ररूप

India IT Sector: टेक विश्वात ‘ले-ऑफ’चा भूकंप, भारताला फटका; मागील सहा महिन्यांतच १.१९ लाख जणांचा रोजगार गेला

Bhandara Accident: भंडाऱ्यात भीषण अपघात! भरधाव ट्रेलरची एसटी बसला जोरदार धडक; चालक-वाहकासह सात जण जखमी

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन तीव्र; १८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची 'सद्बुद्धी यात्रा'

Kolhapur Accident: हृदयद्रावक! कागलमध्ये जुने घर कोसळले; आईचा मृत्यू, शेजारी बसलेला १४ वर्षीय मुलगा बचावला

SCROLL FOR NEXT