deglur.jpg 
मराठवाडा

देगलूरातील मजुरांची धान्याअभावी तेलंगणात उपासमार

अनिल कदम


देगलूर, (जि.नांदेड) ः ‘कोराेना’च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्यानंतर राज्य सरकारने सीमाबंदी, जिल्हा बंदी लागू केल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रत्येक राज्यातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांना आहे तिथेच थांबण्यासाठी संपूर्ण व्यवस्था तेथील प्रशासनातर्फे केली आहे. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी तेलंगणा राज्यात होताना दिसून येत नसून त्याचा फटका नांदेड जिल्ह्यातील मजुरांना बसला आहे. धान्यसाठा संपल्याने तीस मजुरांची उपासमार झाल्याने ते तेलंगणातील खम्ममपासून सत्तर किलोमीटर अंतरावरील दुर्गम अशा शेतात अडकले आहेत.

अश्रुंना वाट मोकळी
मजुरांनी आपबिती सांगताना अश्रुंना वाट मोकळी करून माहिती दिली. कुशावाडी, गवंडगाव तांडा (ता.देगलूर) शिरूर चौकी, बारूळ, (ता.कंधार) यांच्यासहीत इतर मजूर तेथे अडकून पडले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून सातशे किलोमीटरवर असलेल्या पाेकलगुडम (जि.काेतागुडम) येथील रामदास लच्छीराम या शेतकऱ्याच्या शेतातील मिरची तोडण्यासाठी गेल्या तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रातून येथे मजूर गेले आहेत. मात्र, गेल्या आठवड्यापासून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने आम्हाला दुर्गम भागातील शेतातून ना गावात जाता येते, ना तालुक्याच्या ठिकाणी जाता येते. आमच्या जवळील धान्यसाठा संपल्याने लेकरा बाळांची उपासमार होत असून येथील सरकारी यंत्रणेकडून आम्हाला अद्याप मदत मिळाली नसल्याची माहिती शिवाजी जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घालावे लक्ष 
जिल्हाधिकारी डॉ.विपिन यांनी जिल्ह्यातील मजुरांची तेलंगणात धान्याअभावी होत असलेली उपासमार थांबविण्यासाठी तेथील प्रशासनाला याची माहिती देऊन त्यांचा प्रश्‍न सोडवावा अन्यथा त्या तीस मजुरांच्या स्थलांतरासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.


मजुरांची आर्त हाक
पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले हे कुटुंब परराज्यात दुर्गम अशा शेतात वास्तव्यास आहे. त्यामुळे या संचारबंदीची पुसटशीही कल्पना त्यांना आली नसावी अन्यथा ते गावाकडे केव्हाच परतले असते. मात्र, अशा परिस्थितीत तेथील प्रशासनाने त्यांची योग्य ती सोय करायला हवी, अशी प्रतिक्रीया माजी प्राचार्य व कुशावाडीचे ज्येष्ठ नागरिक गंगाधरराव हिंगोले यांनी या प्रसंगी बोलताना दिली. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT