file photo 
मराठवाडा

पत्‍नी- पत्‍नीच्या भांडणात नऊ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्‍यू 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव तालुक्‍यातील सवना येथे आई वडिलांचे भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी मुलगी मध्ये गेली असता यावेळी रागाच्या भरात वडिलांनी तिच्याच डोक्‍यात लोखंडी रॉड मारला त्‍यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात उपचारासाठी घेवून जाताना तिच्या रस्‍त्‍यातच मृत्‍यू झाल्याची घटना बुधवार (ता. ११) पहाटे घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवना येथील विनोद देविदास भालेराव याचा त्याची पत्नी रत्नमाला विनोद भालेराव यांच्यासोबत मंगळवारी ( ता. १०) रात्री वाद झाला होता. यावेळी विनोद याने पत्नी रत्नमाला यांना विचारलेल्या प्रश्‍नांना त्या उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने यांच्यातील वाद विकोपाला गेला.

पत्नीलाही गंभीर दुखापत

यामध्ये विनोद याने रागाच्या भरात लोखंडी रॉडने रत्नमाला यांच्या डोक्यात वार केला मात्र त्यांनी हा वार चुकविल्यामुळे त्यांच्या तोंडावर रॉड लागला. त्यामध्ये त्यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून त्यांची मुलगी वैष्णवी (वय नऊ) ही झोपेतून जागी झाली.

आई- वडिलांचा वाद सेडविणे बेतले चिमुकलीच्या जीवावर

आई- वडिलांचे भांडण सोडविण्याचा तीने प्रयत्न केला. आईला मारू नका असे ती म्‍हणत होती. मात्र रागात असलेल्या विनोद याने वैष्णवीच्या डोक्यात रॉड मारला. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या डोक्यातून रक्त येत असल्याने घाबरलेल्या विनोदने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला उपचारासाठी सवना येथील खाजगी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.

पोलिसांनी केले मारेकऱ्यास अटक

घटनास्थळी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री श्रीमनवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक साहेबराव राठोड यांनी भेट दिली. पोलिसांनी विनोद भालेराव याचा जवाब नोंदविला असून त्याने लोखंडी रॉड लागल्यामुळे वैष्णवीचा खून झाल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी विनोद भालेराव यास ताब्यात घेतले आहे. तर जखमी रत्नमाला भालेराव यांच्यावर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्‍यान हा वाद कशावरून झाला याची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून विनोद भालेराव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : ११ चौकार, १ षटकार! पृथ्वीच्या आक्रमक खेळीमुळे वैभव सुर्यवंशीचे विश्वविक्रमी शतक व्यर्थ; महाराष्ट्राचा बिहारवर विजय

मुंबई- पुणे नाही तर 'या' ठिकाणी सुरू आहे सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीचा विवाहसोहळा; पाहुणे कोण कोण आले पाहिलंत का?

Mumbai Crime: आधी मिठी, गाल ओढून चावण्याचा प्रयत्न, नंतर गुप्तांगाला...; ६० वर्षीय नराधमाचे चिमुकल्यासोबत नको ते कृत्य; मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live Update : परभणीच्या जिंतूर नगरपरिषद मतदानादरम्यान तणाव

माेठी बातमी ! 'शासकीय कर्मचारी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी बहीण'चा लाभ'; शासनाच्या आदेशाला केराची टाेपली !

SCROLL FOR NEXT