Santoshi Thube  
मराठवाडा

चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा

शिऊर (जि.औरंगाबाद) ः चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादानंतर पतीने विळ्याने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. 30) रात्री पोखरी (ता. वैजापूर) येथे घडली. संतोषी अशोक ठुबे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस जेरबंद करून गुन्हा दाखल केला आहे.


पोखरीजवळच हैबतवाडी रस्त्यालगत ठुबे वस्तीवर अशोक मन्सूब ठुबे (वय 26) हा पत्नी संतोषी आणि आई-वडील व मुलांसह राहतो. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या अशोक ठुबे याचा 2016 मध्ये लासूरगाव येथील संतोषी उर्फ मंगलसोबत विवाह झाला होता. कुणात फारसा न मिसळणाऱ्या व एकलखोर असलेल्या अशोकला तीन वर्षांचा मुलगा व 11 महिन्यांची मुलगी असून सर्वजण शेती करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून अशोक पत्नीवर संशयातून वाद घालत होता. सदर प्रकार संतोषी आपल्या आई-वडिलांना फोनवरून कळवत असे. वारंवार हा प्रकार घडत असल्याने संतोषीचे वडील कृष्णा गोंडे यांनी त्यांचा पुतण्या विक्रम यास समजुतीकरिता मध्यस्थी म्हणून एकदा पोखरीला पाठवले होते.

त्यावेळी अशोकची समजूत घातली होती. मात्र, हा प्रकार सुरूच होता. शनिवारी (ता.30) सकाळी आई-वडील शेतात गेले असता दिवसभर अशोक आणि मंगल हे दोघे घरीच होते. दोघांत सायंकाळी सहाच्या सुमारास वाद झाला. चारित्र्यावर संशय घेत अशोकने मंगल हिच्या गळ्यावर घरातील विळ्याने वार करून खून केला. खुून करून तो अंगणातच रक्ताने माखलेल्या कपड्यांतच बसला होता.

शेतातून आई-वडील घरी आल्यानंतर झालेला प्रकार उघडीस आला. शिऊर पोलिसांना घटना समजल्यानंतर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. रविवारी (ता. एक) दुपारी मृत संतोषीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात संतोषीचे वडील कृष्णा गोंडे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Mobile Loan Rules : आता EMI थकवल्यास बँक तुमचा मोबाईल करणार बंद; आरबीआयचा मोठा निर्णय!

सोनू निगमला का विकावी लागली कर्जतमधील जमीन? 10 लोकांनी मिळून खरेदी केली प्रॉपर्टी, कितीचा झाला व्यवहार?

Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये बिबट्याचा थरारक हल्ला; मोठ्या बहिणीच्या धाडसाने १० वर्षीय काव्याचे प्राण वाचले, बिबट्याशीच घेतली झुंज..

Maharashtra politics: ‘राष्ट्रवादी’ विलीनीकरणाचा विषय समाप्त; शशिकांत शिंदे यांचे मुंबईतील बैठकीत स्पष्टीकरण, २२ आमदारांच्या भेटीस दुजोरा नाही

Latest Marathi News Live Update : मुलीची छेड काढण्यावरून संभाजीनगरात दगडफेक; जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT