संग्रहित छायाचित्र  
मराठवाडा

सैन्यातून निवृत्त होऊन परतलेल्या पतीला बीडमध्ये केले क्वारंटाइन

सुधीर एकबोटे

पाटोदा (जि. बीड) - देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढणाऱ्या आणि सेवानिवृत्तीनंतर परतलेल्या पतीला कोरोनाशी मैदानात लढणाऱ्या पत्नीने शेतात पाठवत क्वारंटाइन केले. मळेकरवाडी येथे मंगळवारी (ता. २८) आशाबाई टेकाळे यांनी आपले कर्तव्य बजावले आणि संजय मळेकर यांनीही पत्नीचे आदेश मानले. 

तालुक्यातील मळेकरवाडी येथील आशाबाई टेकाळे या डोंगरकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात. सध्या परजिल्ह्यातून आलेल्यांची प्राथमिक तपासणी, नोंदणी आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांची नोंद असे काम आशा स्वयंसेविकांकडे आहे. कोरोनाच्या लढ्यात आशा स्वयंसेविकांचे काम वाखाणण्याजोगे आहे. दरम्यान, त्यांचे पती संजय मळेकर देशसेवेसाठी सैन्यात होते. जबलपूर (मध्य प्रदेश) येथे सेवा बजावून ते ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु लॉकडाउनमुळे त्यांना घरी परतता आले नाही. त्यांनी कायदेशीर परवानगी घेत मंगळवारी दुपारी गाव गाठले. परंतु त्यांची गाठ कोरोनाशी लढणाऱ्या पत्नी आशाबाईंशी पडली. 

याचवेळी आशाबाई बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांची नोंद घेत होत्या. ५७ लोकांच्या नोंदीनंतर ५८ वी नोंद पती संजय मळेकर यांची घ्यावी लागली. नाते हे अतूट असले तरी कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आशाबाईंनी क्षणाचाही उशीर न करता त्यांना शेतात जाण्याचे फर्मान सोडले. शत्रूशी दोन हात करणाऱ्या संजयरावांनी पत्नीची आज्ञा मानत थेट शेत गाठले आणि स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले. एकाने सैनिक म्हणून देशसेवा करताना शत्रूशी लढा दिला तर आशाबाई या कोरोनाशी लढत आहेत.

दोघांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव यानिमित्ताने करून दिली. याची माहिती कळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर शिंदे, डॉ. सुमेधा भोंडवे यांनी त्यांचे स्वागत केले. माझ्यामुळे कुटुंब व ग्रामस्थांना त्रास होणार नाही, याची आपण काळजी घेत असल्याचे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे आशाबाई सांगतात. सुरक्षित अंतर ठेवूनच पुढील २८ दिवस त्यांची काळजी घेऊ, असेही आशाबाई म्हणाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Caste Validity: जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया झाली सोपी; आता सर्व काही ऑनलाइन!

Pune Bopdev Ghat Accident Breaking : पुण्यातील बोपदेव घाटात भीषण अपघात! भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉपवरील विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला; २ जणांचा मृत्यू तर ३ गंभीर

ICC Test Rankings: बुमराहने मारली मोठी लांब उडी, नंबर-१ च्या दिशेने वाटचाल; यशस्वी जयस्वालची टॉप-१० मध्ये धडक

Mandar Kivale case : पुण्यात कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबार अन् कोयत्याने हल्ला, जुना वाद समोर

Latest Marathi News Live Update: ८०.१५ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT