Gangakhed railway flyover sakal
मराठवाडा

मराठवाड्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध ; अशोक चव्हाण

गंगाखेड : रेल्वे उड्डाणपुलाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

गंगाखेड : महाराष्ट्रातील प्रवाशांसह वाहनचालकांच्या बहुचर्चित असलेला गंगाखेडचा रेल्वे उड्डाणपूल (Gangakhed railway flyover)तब्बल बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास गेला असून या रेल्वे उड्डाणपुलाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते (ता.९) जानेवारी रविवार रोजी लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी अशोक चव्हाण यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.

(ता.९) जानेवारी रोजी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खा. संजय जाधव, आ. डॉ.रत्नाकर गुट्टे, आ. सुरेश वरपुडकर, आ. राहुल पाटील, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. अमर राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, मा. आ.डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी खा. तुकाराम रेंगे आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होऊन लोकार्पण करण्यात आले. पुढे बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मी मराठवाड्याचा आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. मी मराठवाड्याच्या विकासाचा अंतर्गत कधीही भेदभाव केलेला नाही. मराठवाडा माझा म्हणून मी सदैव विकासासाठी तत्पर आहे.(Marathwada news)

फळा येथील रस्ता, कौडगाव येथील पूल, रावराजुर येथील रस्ता, सुनेगाव- सायाळा येथील पुलास मंजुरी देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून देणार आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ १२४ कामास मंजुरी देत ११६७ कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी केले तर सूत्रसंचालन पदुदेव पालमकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता प्रदीप होटकर, उप अभियंता बालाजी पवार, ठेकेदार असलम खान अब्दुल गफुरखान यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी व ए.जी. कन्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Reality Explained: नेपाळ सरकारचं खरंच चुकलं की Gen Z चा अभ्यास कमी पडला? खरं वास्तव काय?

Beed Crime : बीडमध्ये वडिलांनंतर ३ वर्षीय चिमुकलीचाही संशयास्पद मृत्यू, झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

आनंदाची बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात पाेलिस दलात २२५ पदांची भरती'; सप्टेंबरअखेर भरा अर्ज, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘मैदानी’चे नियोजन

Who is Sushila Karki? सुशीला कार्की नेपाळच्या प्रमुखपदी? भारतासाठी आनंदाची बातमी की नवी डोकेदुखी? संबंध कसे असतील?

Gokul Dudh Politics : गोकुळ दूध संघात सत्ता महायुतीची; वर्चस्व मात्र हसन मुश्रीफ- सतेज पाटील यांचेच, महाडिक -मंत्री मुश्रीफ यांच्यात नवा वाद...

SCROLL FOR NEXT