डीवायएसपी वशीम हाश्मी 
मराठवाडा

मुझे इश्क है वतन से, मेरी जान हिंदूस्थानी...कोरोनासे देश बचाओ होगी मेहरबानी...

येथील पोलिस विभागाच्या वतीने गुरुवारी गरजूंना अन्नधान्याची किट वाटप करुन मदतीचा हात दिला. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शहरातून पथसंचलन केले.

संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : सध्या लाॅकडाऊनमध्ये नागरीकांनी निर्बंध पाळावे म्हणून पोलिस बांधव प्रेमाने सांगण्यापासून ते आर्थिक दंड आकारणे पर्यंत सर्वोत्परी प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु शहरात विनाकारण फिरणारांची संख्या कमी होताना दिसत नाही. यावर उपविभागीय पोलिस अधिकारी वाशीम हाश्मी यांनी गुरुवारी ( ता. २७) सायंकाळी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे शहरात पथसंचलन करीत विविध चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर गाणे गाऊन कोरोना संदर्भात नागरीकांची जनजागृती केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गातांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

येथील पोलिस विभागाच्या वतीने गुरुवारी गरजूंना अन्नधान्याची किट वाटप करुन मदतीचा हात दिला. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शहरातून पथसंचलन केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी वसीम हाश्मी यांनी स्वतः गीत गायन करुन नागरिकांना कोरोना बाबतचे निर्बंध पाळण्याचे आवाहन केले. शहरातील प्रमुख चौकात त्यांच्या गायनाचा आगळावेगळा कार्यक्रम पहावयास मिळाला.

हेही वाचा - दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची कार्यपद्धती आणि अकरावीसाठी होणारी ‘सीईटी’याबाबत शिक्षण क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

यावेळी श्री हाश्मी यांनी ' मुझे इश्क है वतन से, मेरी जान हिंदूस्थानी, कोरोना से देश बचाओ, होगी बडी मेहरबानी' तसेच ' जिना है तो घर में रहो, कोरोना है वायरस बुरा, पोलिस को तुम ना दुश्मन कहो, करते है हम फर्ज अदा, मिटेल ना कही तुम्हारे निशा, कोरोना है वायरस बुरा' अशा अनेक हिंदी गाण्यांच्या चालीवर बहारदार गाणे गात नागरीकांमध्ये कोरोना निर्बंध पाळणे, सावधगीरी बाळगणे आदी बाबत जनजागृती करुन समाजप्रबोधन केले. विशेष म्हणजे सदरील गाण्यांची रचना श्री. हाश्मी यांच्या सुविद्य पत्नी यांनी लिहिली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बहारदार आवाजात कोरोनाचे नियम पाळणे बाबतची जनजागृती शहरात पहिल्यांदाच ऐकावयास मिळाली.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश आवडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू सिद्दिकी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड यावेळी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT