if electricity bill not paid connection will cut off msedcl warns consumer
if electricity bill not paid connection will cut off msedcl warns consumer Sakal
मराठवाडा

Hingoli News : बिले न भरल्यास कनेक्शन तोडणार; महावितरणचा ग्राहकांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर वीज बिल थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरण कंपनीची धावपळ सुरू आहे. यापूर्वी थकबाकी भरण्यासाठी हप्त्याची सुविधा होती. आता मात्र थकबाकी एकरकमी भरावी लागणार आहे.

अन्यथा वीज जोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. तसा इशाराच महावितरणकडून वीज ग्राहकांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात महावितरणचे घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांची संख्या एक लाख ४४ हजार ६४९ एवढी आहे. या ग्राहकांकडे ३०.४ कोटी रुपयांची वीज बिलापोटी थकबाकी आहे. मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून वसुली मोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाईन पद्धतीने विनामर्यादा वीज बिलांचा भरणा करता येणार आहे. या व्यतिरिक्त महावितरणने पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीज बिलावर उपलब्ध आहे. सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक वीज बिल वसुलीसाठी महावितरणची शहरांसह ग्रामीण भागात धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीज जोडण्यांची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडे वीज बिलापोटी ३० कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणची संपूर्ण यंत्रणा थकीत देयकांची रक्कम वसूल सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत ग्राहकांना त्यांच्याकडे असलेली थकबाकी एकरकमी अदा करावी लागणार आहे.

वीज ग्राहकांकडे थकबाकीचा आकडा वाढतो आणि महावितरणला नाईलाजास्तव वीज जोडणी खंडित करण्याची कारवाई करावी लागते. यामुळे वेळेत रक्कम भरुन सहकार्य अपेक्षित आहे. वीज जोडणी खंडित होऊ द्यायची नसेल तर ग्राहकांनी तातडीने एकरकमी वीज बिल थकबाकी भरावी.

— दिनकर पिसे, अभियंता, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT