Nanded Photo 
मराठवाडा

Video : लॉकडाउनमध्ये कामगारांच्या हाताला काम दिल्यास पोटाचा प्रश्न सुटेल

शिवचरण वावळे

नांदेड: लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु झाल्याने खऱ्या अर्थाने हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे हाल सुरु झाले आहेत. सरकार, स्वंयसेवी संघटना यांच्याकडून अन्नधान्यांचे वाटप होत आहे. परंतु, ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही, मदतीचेही हात पोहचले नाही अशा हमाल, कष्टकऱ्यांचे काय? असा प्रश्‍न हमाल मालाडी कामगार संघटनेचे सचिव भुजंग कसबे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान लॉकडाउन असले तरी, हातावर पोट असलेल्या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे असे स्पष्ट मत ई-सकाळशी बोलताना श्री. कसबे यांनी व्यक्त केले आहे.

नांदेड जिल्ह्यात पाच हजारपेक्षा अधिक हातावर पोट असलेल्या हमाल, कामगारांची संख्या आहे. परंतु सध्या शासकीय गोदाम, वखार महामंडळ, अत्यावश्यक भुसार माल विक्रेते अशी काही मोजकी दुकाने सुरु आहेत. त्यामुळे मोजक्याच हमालांना काम मिळत आहे. शिवाय लॉकडाउनच्या कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. ‘कोरोना’आजारापासून बचाव करण्यासाठी आरोग्य सुविधा आणि इतर साधने उपलब्ध नसल्याने मालक देखील सर्वच कामगारांना रोजगार देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे.

हाताला काम नाही खायचे काय?
पाच हजारपेक्षा अधिक हमाल, कामगार असले तरी, त्यातील मोजक्याच कामगारांच्या हाताला काम मिळत आहे. तर, अनेकांची कुटुंबे एकट्या कामगाराच्या जिवावर सुरु असते. अशा कामगारांचे हाल सुरु झाले आहेत. शिवाय त्यांच्या घरी दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उद्भवत आहे. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही, अशा कुटुंबियांना उशिरा राशन देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. मात्र, हाताला काम नसलेल्या कामगारांनी खायचे काय? त्यामुळे कुठलीही अट न घालता सरसकट सर्वच हातावर पोट असणाऱ्यांना राशन द्यावे, अशी मागणीही भुजंग कसबे यांनी यावेळी केली आहे. 

लॉकडाऊनमुळे कामावर जाण्याची भीती वाटते
नांदेड जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना संक्रमीत रुग्ण नाही. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. तेव्हा शासनाने तळहातावर पोट असणाऱ्या हामालांना आरोग्य सुविधा पुरवून त्यांच्यासाठी सोशल डिस्टन्सच्या नियमाप्रमाणे कामाची संधी उपलब्ध करुन द्यावी. लॉकडाउनमध्ये शिथितीलता द्यावी; जेणे करुन हामालांना कामावर जाण्यासाठी भीती वाटणार नाही. 
- भुजंग कसबे, सचिव (हमाल मापाडी महासंघ, नांदेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT