फोटो 
मराठवाडा

रंगाचा बेरंग कराल तर याद राखा- एसपी विजयकुमार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : धुळवड खेळत असतांना तरूण युवकांनी कुठल्याही सामाजीक शांततेला गालबोट लागेल असे वर्तन करु नका, रंगाचा सण उत्साहात साजरा करा, परंतु रंगाचा जर बेरंग करण्याचा प्रयत्न केला तर संबंधीतावर कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला आहे. यासाठी जिल्हाभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. 

मंगळवारी (ता. १०) मार्च रोजी साजरी होणारी धुळवड अतिशय शांततेत पार पाडा. विशेष करून कुठलीही नशापाणी न करता आपल्या परिवारासोबत वेळ खर्च करा. तसेच मद्य प्राशन करून वेडीवाकडी वाहने चालवू नका. आपल्या वागण्याचा त्रास इतर लोकांना होणार नाही याची काळजी घ्या. विशेष करून शहर व जिल्ह्यात तगडा बंदोबस्त लावला असून आपल्या प्रत्येक हालचालीवर पोलिस लक्ष ठेवून राहणार आहे.

पोलिस प्रशासनाला मदत करा - आवाहन

रंगाचा उत्सव बेरंग होणार नाही व आपण कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही याची दक्षता घेऊन पोलिस प्रशासनाला मदत करा असे आवाहन जिल्हा पोलिस दलाचे प्रमुख म्हणून विजयकुमार मगर यांनी केले आहे. विशेष करून महिला व मुलींच्या तसेच इतर धर्मियांच्या भावना दुखावतील असे वर्तन केल्यास आपल्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा श्री. मगर यांनी दिला आहे.

२५ ठिकाणी नाकाबंदी
 
शहरात जवळपास २५ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून वाहन तपासणी करण्यात येणार आहे. आपल्या वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवा अन्यथा पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मद्य पीऊन कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला तर आपली धुळवड पोलिस लॉकअपमध्ये साजरी करावी लागेल. तशा सुचना सर्व बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. 

असा आहे पोलिस बंदोबस्त : 

एक पोलिस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ११ उपविभागीय पोलिस अधिकारी, ३८ पोलिस निरीक्षक, १५६ सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, २७६५ सहाय्यक फौजदार, हवालदार, शिपाई आणि महिला पोलिस, दंगा नियंत्रण पथकाच्या आठ तुकड्या, एक राज्य राखीव पोलिस बलाची कंपनी यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा, शहर वाहतुक शाखा, जिल्हा विशेष शाखा आणि नियंत्रण कक्षातील कर्मचारी व अधिकारी असा तगडा पोलिस बंदोबस्त.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Tukaram Maharaj Palkhi : उद्योगनगरी भक्तिमय! संत तुकाराम महाराज पालखीचे शहरात स्वागत

Flood Alert: भीमाशंकर-आहुपे पट्ट्यात मुसळधार पावसाने घोडनदी तुफानी; शिरूर शहरातील कोल्हापूर पद्धतीचे २७ बंधारे ओव्हरफ्लो

Saath Chal : पिंपरीत ‘जलसंवर्धन’ वारी; ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स यांचा ‘साथ चल’ उपक्रम

Junnar Heavy Rains: जुन्नरच्या आदिवासी पट्ट्यात मुसळधार पावसाचा कहर; रस्ते, पूल जलमय, शेतपिकांचे मोठे नुकसान

Mumbai News : फुले, फुगे अन् 'I Love You'... 'सुहागरात एक्स्प्रेस'चा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा सवाल, 'ही परवानगी कुणी दिली?'

SCROLL FOR NEXT