परभणी ः कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका जिल्ह्यातील उद्योग व्यवसायांना बसला आहे. परंतु, लॉकडाउनचा दुसरा सर्वाधिक गंभीर परिणाम दिसून आला आहे तो म्हणजे मूळव्याधीच्या त्रासाचा. लॉकडाउनमध्ये एकाच जागी बसून राहिल्याने व आहारविहारामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात झालेल्या बदलामुळे या व्याधीने डोके वर काढले आहे.
कोरोनाकाळात बैठक व्यवस्थेमुळे व्यक्ती आळशी झाली आणि यातून पोटाचे, पचनक्रियेच्या तक्रारी वाढत जाऊन मलबद्धता वाढत असल्याने मूळव्याधीच्या त्रासात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक रुग्णांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत भयंकर आहे. हा त्रास वेदनादायी असला तरीही या आजाराबद्दल फारसे खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेकांमध्ये या त्रासाची तीव्रता वाढल्यानंतर वैद्यकीय मदत घेतली जाते. फास्टफूड, अरबट चरबटपदार्थ, मसालेदार पदार्थांवर ताव मारण्याची सवय यामुळे केवळ जिभेचे चोचले पुरवले जातात; मात्र खाण्याच्या अशा सवयींमुळे पचनाचे आजार बळावतात. मूळव्याध जडण्यामागेदेखील अशीच कारण असतात.
हेही वाचा - नीट परीक्षेसाठी सुरक्षा साधनांचा पुरेपुर वापर, परभणीतून इतरत्र २० बस रवाना
मूळव्याधीची लक्षणं कोणती?
खाज येणे ः गुद्द्वाराजवळ खाज येणे हे मूळव्याधीतील एक प्रमुख लक्षण आहे. त्यामागील निदान करण्यासाठी अॅनल पॅथोलॉजी करावी. हा त्रास कमी न झाल्यास त्वचेवर इंफेक्शन पसरण्याची शक्यता असते.
वेदना जाणावणे ः वैद्यकीय सल्ल्यानुसार, शौचाच्या ठिकाणी वेदना किंवा त्रास जाणवणे हे मूळव्याधीचे लक्षण आहे. त्यामुळे गुद्द्वाराजवळ तीव्र वेदना जाणवतात.
सूज, गाठ ः अनेकांना गुद्द्वाराजवळ गाठ किंवा सूज आढळत असल्यास त्याकडे लक्ष द्यावे. कॅन्सरची गाठ गुद्द्वाराजवळ आढळण्याची वेळ फारशी येत नाही. मात्र, मूळव्याधीमध्ये हे लक्षण आढळून येते.
शौचाच्यावेळी वेदना ः मूळव्याधीच्या त्रासामध्ये गुद्द्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर दाब आल्याने मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडते. सोबतच वेदना जाणवतात.
शौचातून रक्त पडणे ः पोटाच्या कॅन्सरपासून ते मूळव्याधीपर्यंत रक्त पडणे हे लक्षण आढळून येते.
आहारावर नियंत्रण ठेवावे
जीवनपद्धतीमध्ये बदल करून आहारावर नियंत्रण ठेवावे, दररोज चालणे, व्यायाम, सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, ध्यान आदी करावे. व्यसनापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. योग्य वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. नागरिक कोरोना काळात आयुर्वेदिक काढे घेत आहेत. काढे अति उष्ण असल्याने त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काढ्याचे सेवन करावे. - डॉ. आनंद कुलकर्णी, उंडेगावकर, परभणी.
संपादन ः राजन मंगरुळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.