If You Use the name of Maratha Kranti Morcha So beware
If You Use the name of Maratha Kranti Morcha So beware 
मराठवाडा

मराठा क्रांती मोर्चाचे नाव वापराल तर खबरदार! 

अतुल पाटील

औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चा हे नाव समाजाची आस्था आहे. सामाजिक एकता आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठीच हे नाव वापरावे. वैयक्‍तिक, पक्ष, संघटना बांधणीसाठी कुणी वापर करताना आढळल्यास समन्वयक आणि समाज त्यांना रोखठोक उत्तर देतील, असा ठराव येथील मोर्चातर्फे आयोजित समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला. 

मराठा क्रांती मोर्चातर्फे टीव्ही सेंटर, हडको परिसरात नुकतीच बैठक पार पडली. मराठा क्रांती मोर्चा हे बॅनर वापरुन राज्यातील वेगवेगळ्या भागात राजकीय पक्ष सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात येत आहे. याची दखल घेत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. समन्वयकांनी मते नोंदविली. मराठा क्रांती किंवा सकळ मराठा या नावाने कुणी पक्ष काढत असेल तर, होणाऱ्या परिणामांना ते स्वत: जबाबदार राहतील. मराठा क्रांती ही समाजाची आस्था बनली आहे. ज्या वेळेस सामाजिक एकता, अन्यायाविरुद्ध लढा उभारायचा असेल त्या वेळेस मराठा क्रांती मोर्चा ताकतीने ते आंदोलन उभे राहील. इतर वेळी या बॅनरचा कोणी वापर करु नये, असा ठरावच घेण्यात आला आहे. 

बैठकीला मोर्चाचे समन्वयक प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, विजय काकडे, रमेश गायकवाड, ऍड. सुवर्णा मोहिते, सुनिल कोटकर, मनोज गायके, अंकत चव्हाण, रामेश्‍वर राजगुरेख शिवाजी जगताप, प्रदीप हारदे, प्रशांत शेळके, बाळासाहेब औताडे, संदीप सपकाळ, योगेश औताडे, विलास औताडे, रेखाताई वहाटुळे, अशोक वाघ, सतीश वेताळ आदींची उपस्थिती होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT