फोटो 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरूच, एक बोट केली उध्दवस्त

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लाॅकडाऊन काळातही मुदखेड तालुक्यातील वासरी येथे अवैध वाळू उत्खनन राजरोसपणे चालू आहे. जिल्हाधीकारी यांनी ता. २६ एप्रिल रोजी तहसीलदार यांची कानउघाडणी करताच त्यांनी आपले सहकारी नायब तहसीलदार संजय नागमवाड यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. यावरुन श्री. नागमवाड यांनी वासरी येथे गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणारी एक बोटींग यंत्र रंगेहाथ पकडुन  उध्वस्त केली. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

ता. २६ एप्रिल रोजी वासरी तालुका मुदखेड येथील गोदावरी नदीच्या काठावर रेती काढण्याच्या उद्देशाने  ठेवण्यात आलेली एक बोट रंगेहाथ पकडली. तर दोन बोटींग ह्या वाळू माफियांनी महुसल विभागाच्या हातावर तुरी देऊन पळवून नेल्या आहेत. गोदावरी नदीपात्रातून हजारो ब्रास वाळू अवैध मार्गाने काळअया बाजारत जात असते. 

या महसुल पथकाची कारवाई

पकडलेल्या बोटींग यंत्र हे जाग्यावर उध्वस्त करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी सांगितले आहे. सदर कारवाई ही उपविभागीय अधिकारी पवनकुमार चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार संजय नागमवाड, मंडळ अधिकारी हयुन पठाण, बालाजी कु-हाडे, तलाठी प्रविण होंडे या पथकाने केली. 

५० बोटींग यंत्र तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते

मुदखेड तालुक्यातील वासरी येथे अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी ५० बोटींग यंत्र तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. गोदावरी नदीपात्रातील शेजारच्या शेतात हे बोटींग यंत्र लपून ठेवण्यात आल्याची गुप्त चर्चा वासरीतील नागरीक सांगत आहेत. तसेच अवैध वाळू उपस्याचा साठा काटेरी शेतात टाकून वाळू माफिया आपला गोरखधंदा करत आहेत. हे सर्व महसुल विभागाला माहित असतांना त्यांच्यावर कारवाई करण्यास महसुल विभागाचे अधिकारी आर्थीक संबंध बिघडू नये म्हणून डोळेझाक करतात असा नेहमी त्यांच्या आरोप होतो. 

जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी लक्ष घालावे

सध्या गोदावरी नदीपात्रात पाणी साठा कमी झाल्यामुळे वासरी येथे रात्रीच्या सुमारास शेकडो टीप्पर नांदेडहुन वाळू वाहतूक होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी मुदखेड तालुक्यातील वासरी येथील अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात मुसळधार! शाळा पाण्यात, रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; पाणीच पाणी

Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Thane Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, शाळेसमोरच सुरू होता प्रकार; ५ तरुणींची सुटका; दोघांना अटक

फाळणीची जखम आणि आशेचा किरण! प्रीती झिंटा अन् सनी देओलच्या 'बटवारा १९४७' चित्रपटाची पहिली झलक

Latest Live Updates Marathi : मुसळधार पाऊस, नागपूर खंडपीठातील वकिलांच्या दालनासमोर साचलं पावसाचे पाणी

SCROLL FOR NEXT