file photo 
मराठवाडा

अवैध वाळू उत्खनन थांबेना!

सकाळ वृत्तसेवा

मानवत (जि.परभणी) : मानवत तालुक्यातील वाळु घाटावरून सध्या अवैध वाळू उपसा सुरु आहे. एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेल्या नसताना रात्री चोरटी वाहतूक केली जात आहे. महसूल प्रशासनाने गुरुवारी (ता.पाच) रात्री हमदापुर येथे एक वाहन ताब्यात घेतले तर तीन वाहने वाळुमाफियांनी पळवली. शुक्रवारी (ता.६) रात्री नऊ वाजता पोलिस प्रशासनाने मगर सांवगी येथे एका वाहनावर कारवाई केली तर तहसीलदार डी. डी. फुफाटे यांनी शनिवारी (ता.७) सकाळी सात कोथाळा येथे वाजता केलेल्या कारवाईत पाच वाहने ताब्यात घेतले.

मानवत तालुक्यात एकूण बारा वाळु घाट असून यापैकी हटकरवाडी, रामपुरी, कुंभारी, वांगी व थार  हे महत्वाचे वाळु घाट गोदावरी पात्रात आहेत. नरळद, इरळद, सांवगी मगर, गोगलगाव, पार्डी, शेवडी जहांगीर व टाकळी निलवर्ण हे वाळु घाट दुधना पात्रात आहेत. यापैकी एकाही वाळु घाटाचा लिलाव झालेल्या नसून निविदा प्रक्रिया सध्या सुरु आहे. साधारणपणे एप्रिल महिन्याच्या सुरवातीस ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला तालुक्यात मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरु असल्याने वाळु टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी वाळूच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पाच ब्रास वाळुसाठी तब्बल पस्तीस ते चाळीस हजार रुपये मोजावे लागत आहेत. या संधीचा फायदा घेऊन वाळुमाफिया सक्रिय झाले असून रात्रीच्या वेळेला बहुतांश घाटावरून वाळू उत्खनन केले जात आहे. या विरोधात महसूल प्रशासनाने पथके स्थापन करून कारवाई सुरु आहे.


वाहने घेतली ताब्यात
पंधरा दिवासांपूर्वी टाकळी नीलवर्ण येथे पोलिस प्रशासनाने एक वाहन ताब्यात घेतले होते. गुरुवारी (ता.पाच) रात्री हमदापुर येथे महसूल प्रशासनाने एक वाहन ताब्यात घेतले होते तर तीन वाहने वाळुमाफियांनी पळवली होती. यानंतर पोलिस प्रशासनाने शुक्रवारी (ता.६) मगर सांवगी येथे साहाय्यक पोलिस निरीक्षक भारत जाधव व पोलिस कर्मचारी नारायण ठमके यांनी विनापरवाना वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी सात वाजता कोथळा शिवारात अवैध उत्खनन सुरु असल्याची माहिती तहसीलदार डी. डी. फुफाटे यांना मिळाली. त्यांनी तलाठी अरविंद चव्हाण यांच्यासह दुचाकीवर जाऊन पाहणी केली असता दहा ते बारा ट्रॅक्टर वाळू उत्खनन करीत असल्याचे आढळून आले. घटनास्थळीवरुन सहा वाहने फरार झाली तर एक हेड क्रमांक (एम. एच.- २२ एच. - ७२७८) व चार विनाक्रमांक ट्राली ताब्यात घेण्यात आल्या. ही वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

वाळु माफियांचे प्रशासनासमोर आव्हान
तालुक्यासह शहरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. तसेच घरकुल योजनेत प्रस्ताव मजूर झालेल्या लाभार्थ्यांकडून वाळुची मागणी वाढली आहे. मागील दहा महिन्यापासून कोणत्याही घाटाचा लिलाव झालेला नसताना चोरट्यामार्गाने वाळु उपलब्ध होत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेले नसताना वाळु उपलब्ध कशी होते?, या प्रश्न उभा राहतो. सध्या तरी महसूल प्रशासनासमोर वाळु माफियांनी आव्हान उभे केले आहे.

दंड वाचविण्यासाठी पळवली जातात वाहने
महसूल प्रशासनाने अवैध उत्खनन रोखण्यासाठी दंडात मोठी वाढ केली आहे. यामुळे वाहनाचे हेड पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. जानेवारी महिन्यात कुंभारी येथे दोन ट्रॅक्टर उत्खनन करताना आढळले होते. परंतु, संबंधित चालक ट्रॅक्टर हेड घेऊन फरार झाले होते. पथकाच्या हाती दोन विनाक्रमांक ट्रॉली लागल्या होत्या. हमदापुर येथून तिन वाहने पळविण्यात आली. तर कोथाळा येथून पाच ते सहा वाहने पळविण्यात आली.
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT