परभणी : रंगाचा सण म्हणून ओळखला जाणारा धूळवडीचा सण मंगळवारी (ता.दहा) उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणासाठी लागणारे रंग, पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, कोरोना व्हायरसमुळे रंगांच्या बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. यंदा प्रथमच भारतीय साहित्यांचा (मेड इन इंडिया) प्रभाव दिसत आहेत.
होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारा धूळवड सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी आठवड्याभरा आधिच तयारी केली जाते. ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात अबालवृद्धांसह सर्वाचांच समावेश असतो. दरवर्षी यंदाही धूळवडीच्या सणासाठी विविध रंग बाजारात उपलब्ध झाले आहेत. शहरातील गुजरी बाजार, गांधी पार्क परिसरात रंगांची दुकाने सजली आहेत. विविध आकारांच्या पिचकाऱ्याही बाजारात आलेल्या आहेत.
हेही वाचा - सावधान...! मराठवाड्यात पाऊस पुन्हा येणार
२० रुपयांपासून पिचकारी
दूरचित्रवाणीवरील लहान मुलांच्या पसंतीच्या कार्यक्रमातील कार्टूनचा आकार आणि चित्र असलेल्या पिचकाऱ्यांना मुले पसंती देत आहेत. त्यात छोटा भीम, स्पायडरमॅन, डोरोमॉन, किंडर जॉय, मिकी माऊस, ॲंग्री बर्डस या चित्रांचा समावेश आहे. २० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंतची पिचकारी परभणीच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. फुग्याचा प्रकार पाहायला मिळत आहेत. फुग्यात रंग भरून प्लॅस्टिक काडीच्या साह्याने एकमेकावर रंग टाकता येता आहे. अगदी दहा रुपयांपासून ही काडी उपलब्ध असून एका रुपयात चार ते पाच फुगे येत आहेत. परभणीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या पिचकाऱ्या मुंबई व हैदराबाद या बाजारपेठेतून आणण्यात आल्या आहेत.
गर्दी टाळण्याचे आवाहन
यंदा प्रथमच रंगांच्या बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. चिनमधील कोरोना वायरस जगभर पसरत आहे. सोशल मीडियावर कोरोना वायरसबद्दल समज-गैरसमज सांगितले जात आहेत. तसेच गर्दी टाळा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. त्यासोबतच शासनाकडून आणि विविध गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकदेखील गर्दीत जाण्याचे टाळू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून रंग बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली आहे. त्यातही चायनीज वस्तूंची मागणी घटली आहे. देशात तयार होणाऱ्या पिचकाऱ्या आणि रंगांना तेवढी मागणी आहे. मात्र, तीही मोजक्याच स्वरूपात आहे. रंगांमध्ये देशी रंग उपलब्ध झाले आहेत. गुजरात, हरिद्वार येथून रंग आलेले आहेत. मात्र, जास्त प्रमाणात खरेदीसाठी ग्राहक येत नसल्याचे विक्रेते सांगत आहेत.
हेही वाचा - ‘बावलगाव’च्या रंगाची किमयाच न्यारी... होळीसाठी रंग पोहचला नागपूरच्या दारी...
पब्जीला पसंती
लहान मुलांसह तरुणामध्ये पब्जी या गेमचे वेड आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही पब्जी गगेमच्या रूपातील पिचकाऱ्या आल्या आहेत. गन, टॅंक आदी स्वरूपातील पब्जी पिचकाऱ्यांनी धूम सुरू केली आहे.
बाजारात मंदी
दरवर्षी प्रमाणे यंदा रंगांच्या बाजारपेठेत वर्दळ नाही. कोरोना व्हायरसमुळे लोक रंग, पिचकाऱ्या खरेदी करण्यात येत नसल्याने बाजारात मंदी सुरू झाली आहे.
श्रीपाद दैठणकर, रंगविक्रेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.