file photo
file photo 
मराठवाडा

‘कोरोना’ साठी हा घेतला महत्वाचा निर्णय 

गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणू (COVID - १९) च्या संसर्गामुळे जिल्हयात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक असून या पार्श्वभूमीवर जिल्हयात कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमा अन्वये जिल्हयातील पाथरी रोडवरील परभणी येथील डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सरस्वती धनवंतरी दंत महाविद्यालय व रुग्णालय कॅम्पस, संपूर्ण इमारत तसेच वसतिगृह व सर्व परिसर वैद्यकीय उपकरणासह आयसोलेशन वार्ड व क्वारंटाईन प्लेसेस स्थापन करण्यासाठी पुढील आदेशापर्यंत अधिगृहीत केले आहे. तरी याठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समन्वयाने वार्ड स्थापन करावेत, असेही आदेशात नमुद आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध, नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असून किराणा दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी होवू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा - गरजू कुटुंबांना मोफत धान्यांचे वाटप
खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी करू नये
 जनतेला सोशल डिस्टन्सींगचे महत्व पटवून दिले जात असून ठराविक अंतरावर ग्राहकांनी शिस्तीत थांबून आपल्या सामानाची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी किराणा दुकानासमोर ठराविक अंतरावर मार्कींग करून सामानाची खरेदी केली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी व आरोग्य विभागामार्फत दुकानदार व ग्राहकांना सुचना देण्यात येत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक प्रमाणात सोयी उपलब्ध असून नागरिकांनी खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

IPL 2024: जड्डूनं 'तो' विजयी चौकार पुन्हा ठोकला अन् चेन्नईकरांच्या गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या

Voter Cards Video : जालन्यात शेकडो वोटर कार्ड कचऱ्यात फेकले; तपास सुरु, व्हिडीओ व्हायरल

Life Line: 'लाईफ लाईन' चित्रपटाची घोषणा; अशोक सराफ, हेमांगी कवीसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका

Naach Ga Ghuma: कौटुंबिक विनोदी चित्रपट; नात्याची गंमतीशीर गोष्ट मांडणारा ‘नाच गं घुमा’

SCROLL FOR NEXT