Collector Dr.Vipin_.JPG 
मराठवाडा

अत्यावश्यक कामासाठी सुधारीत आदेश

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अत्यावश्यक स्वरुपांची कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांचे जिल्हा प्रमुख अधिकारी यांना सुधारीत आदेशाद्वारे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विविध निर्देश दिले आहेत.

या सुधारीत आदेशात सार्वजनिक आरोग्य विभागााचे प्रधान सचिव यांनी राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा ता. १३ मार्च पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार ता. १४ मार्च अधिसुचना निर्गमित केली आहे. आणि ज्या अर्थी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडील अधिसुचना क्र. करोना २०२०/ प्रक्र.५८ / आरोग्य ५ ता. १४ मार्च मध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपायोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.

१४ एप्रिल पर्यंत जमावबंदी आदेश लागू

नांदेड जिल्ह्यात ता. ३१ मार्च पासून ते ता. १४ एप्रिल रोजी मध्यरात्री पर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत पाच व त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा प्रतिबंधामधून वगळण्यात आली आहेत. सद्यस्थितीत आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता पुढील कामे होणे गरजेचे आहे. जेणेकरुन अत्यावश्यक सेवा कोलमडणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटणकर यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन ता. ७ एप्रिल रोजीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करुन पुढीलप्रमाणे सुधारीत अत्यावश्यक स्वरुपाची कामे पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले आहेत.

ही कामे राहतील सुरु 
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य व प्रमुख महामार्गाची, ग्रामीण रस्ते तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत रस्ते दुरस्ती करणे व पावसाळया पूर्वीची दुरुस्तीची कामे. जिल्हयातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण कामकाज, सांडपाणी व्यवस्था व पावसाळ्यापूर्वीची सर्व दुरुस्तीची कामे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि इतर विद्युत विषयक विभागाकडील इलेक्ट्रीक पोल टाकणे व इलेक्ट्रीक मेंटनन्स, दुरस्ती इ. भारत संचार निगम लिमिटेड आणि इतर दुरसंचार कंपनीकडील दूरसंचार आणि इंटरनेट सेवा संचालन, लाईन मेंटनन्स इ. खाजगी क्षेत्रातील संस्थांना एमटीएनएल आणि बीएसएनएलचे जिल्हा स्तरावरील अधिकारी यांनी लेखी आदेश द्यावेत. पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण आणि स्वच्छता इत्यादी अनुषंगिक कामांचा यात समावेश आहे.  

सामाजिक अंतराचे निर्देश पाळावेत 
संबंधित विभागाचे जिल्हा प्रमुख अधिकारी यांना असेही निर्देश दिले आहेत की, त्यांनी वरील अत्यावश्यक सेवेसाठी नमुद अधिकारी, कर्मचारी आणि वाहने याकामी नेमणूक करुन त्याप्रमाणे आदेश आपले स्तरावर काढण्यात यावेत. या आदेशाची प्रत पोलीस विभागाकडे द्यावी आणि सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना कामावर ये-जा करतांना आदेशाची प्रत आणि कार्यालयाचे ओळखपत्र सोबत बाळगण्याच्या सूचना दयाव्यात. तसेच या विभागांनी, संस्थांनी कोविड १९ या विषाणू संसर्गाविषयी आवश्यक ती काळजी घ्यावी. सामाजिक अंतराचे निर्देश पाळावेत आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

आदेशाची होणार तत्काळ अंमलबजावणी
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग प्रतिबंध कायदा तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ व इतर अनुषंगिक कायदानुसार पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदरचे आदेशास तात्काळ अंमल देण्यात यावा, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Bans China Cars : इस्त्रायलमध्ये 'मेड इन चायना' वाहनांवर बंदी, ७०० कार जप्त; सरकारचा 'या' कारणामुळे मोठा निर्णय

अग्रलेख : चला उभारा शुभ्र शिडे ती..

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

फास्ट फूड ते फॅटी लिव्हर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT