धर्माबाद, (जि.नांदेड) ः संचारबंदी लागू होताच हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. पुढे २० दिवसांचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. यातून वस्त्यांमध्ये हमाल व मजूर म्हणून काम करणाऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. केंद्र सरकारने मदत जाहीर केली. मात्र राज्यात हे आदेश यायचे आहेत. असे असतांनाही धर्माबाद शहरातील काही स्वंयसेवी संघटनांनी व ब्राम्हण समाज यासह काकाणी परिवारानेही माणुसकीचे दर्शन घडवीत अन्नाची पाकिटे, खिचडी वितरणास सुरवात केली आहे.
दानशूर व्यक्तींनी अन्नदान करण्याची तयारी
शहरातील कोणी निराधार व्यक्ती किंवा ज्यांना संचारबंदी परिस्थितीमुळे दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे. अशा कुटुंबाचा शोध घेणे चालू असून या कुटुंबाना शहरातील स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी अन्नदान करण्याची तयारी दर्शविली आहे. तरी अशा गरजू कुटुंबांची माहिती नगरपरिषदेला कळवावे, असे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केली आहे.
दररोज १०० किलोची खिचडी वाटप
शहरातील उद्योजक व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग असलेले सुबोध काकाणी यांनी शहरातील विविध भागातील गोर गरीब जनतेला दररोज १०० किलोची खिचडी वाटप सुरू केली असून (ता.१५) एप्रिल पर्यंत खिचडी वाटप करणार असल्याचा संकल्प केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील सर्व व्यापार बाजारपेठ कडकडीत बंद असल्यामुळे मंजूरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपवासमारीची वेळ येत असल्याचे येथील उद्योजक सुबोध काकाणी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शहरातील विविध ठिकाणी राहत असलेल्या गोरगरीब जनतेसाठी दररोज १०० किलो तांदळाची खिचडी करून आपल्या वाहनातून घरपोच वाटप गुरुवार पासून सुरू केले आहे.
हेही वाचा - ‘लॉकडाऊन’चा वाळू माफीयांनी उचलला गैरफायदा
संचारबंदीच्या काळात बाहेरगावाहून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना येथील ब्राह्मण समाजाच्या वतीनेही खिचडी वाटप करण्यात आले आहे. तसेच मुस्लिम बैतुलमाल कमीटीनेही पुढाकार घेत मदत करण्यासाठी सरसावले आहेत. मुस्लिम बैतुलमाल कमिटीच्या वतीने कोलम तांदूळ ५ किलो, गव्हाचे पीठ दोन किलो, साखर एक किलो, तूर दाळ अर्धा किलो, मूग दाळ अर्ध किलो, हरभरा दाळ अर्धा केली, गोड तेल अर्धा किलो, चाय पत्ती ५० ग्रॅम, मसाला पाकीट, जिरा ५० ग्रॅम अशी धान्य किट गरजवंतांच्या घरापर्यंत नेऊन देण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येक भागातील वंचितांसाठी, गरजवंतासाठी ही स्वंयसेवी संघटना व ब्राम्हण समाज यासह काकाणी परिवार भुकेल्यांना अन्न, हीच सेवा म्हणून काम करीत आहेत. या मदतीमुळे संचारबंदी दरम्यान अनेकांचा उदरनिर्वाह सुकर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.