जिंतूर ( जिल्हा परभणी ) : अगोदरच अनियमित व अपुरा पाणीपुरवठा ( Not reguler water suplay) होत असताना मागील महिन्यापासून शहरातील नळांना पिवळसर रंगाचे, शेवाळाचा वास येत असलेले पाणी येत आहे. या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा होत आहे. जिंतूर नगरपरिषदेच्या (Jintur nagarparishad) कामकाजाबद्दल रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. (Impure water hampers the health of citizens; Neglect of Jintur Municipal Council)
शहरातील लोकसंख्येपेक्षा कैक पटीने खर्च करुन नगरपरिषदेतर्फे अद्यापपर्यंत तीन योजना कार्यान्वीत झाल्या असून सध्या चौथ्या योजनेचे काम आहे. येलदरी धरणाच्या समोर पूर्णेच्या पात्रातील योजनेच्या उद्भव मुबलक पाणी उपलब्ध आहे. शिवाय दोन जलशुद्धीकरण केंद्र असून वेगवेगळ्या भागातील जलकुंभाद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो. परंतु नियोजनाअभावी नगरपरिषदेची पाणी वितरण व्यवस्था कोलमडून पडत असल्याने अजूनही शहराला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : टरबूज व खरबूज रस्त्यावर विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
शहरातील वेगवेगळ्या प्रभागात तीन टप्प्यात एक दिवसाआड पाणी वितरित केले जात असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात येत असलेतरी प्रत्यक्षात कुठे तीन, कुठे चार कुठे आठ दिवसाआड नळांना पाणी येते. कधीकधी यापेक्षाही जास्त दिवसांनी येते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कांही प्रभागातील नागरिकांना तर पावसाळ्यात देखील कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यात सभोवतालच्या वसाहतीमधील नागरिक, नोकरदार व मजूरदार वर्गाला पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे.
एवढे असूनही महिन्याभरापासून नळांना पिवळसर रंगाचे व शेवाळ्याचा वास येत असलेले पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा संभव निर्माण झाला आहे. कांही ठिकाणी जुलाबाच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. पालिकेचे प्रशासन, पदाधिकारी, सदस्य यांनी नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.