dharashiv  sakal
मराठवाडा

Dharashiv News : धाराशिव जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

सामाजिक संस्थांना सहकार्याचे केले आवाहन

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयात रक्ताचा खडखडाट आहे. अनेक गरीब रुग्णांना रक्तांची गरज असताना त्यांना रक्ताअभावी बेडवर पडून राहावे लागत आहे. शहरासह जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी रक्ताचा पुरवठा करणे गरजेचे आहे. तर युवकांनी वाढदिवस साजरे करताना रक्तदानाने साजरे करण्याचे आवाहन केले जात आहे.

शहरात नव्याने वैद्यकीय महाविद्यालय झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयातही रुग्णसंख्या वाढत आहे. यातील अनेक रुग्णांना रक्ताची गरज पडत आहे. शिवाय महिला रुग्णांनाही मोठ्या प्रमाणात रक्ताची कमतरता जाणवत आहे. मात्र शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा मोठा तुटवडा झाला आहे. मागणी वाढलेली असताना रक्तसाठा उपलब्ध नाही.

त्यामुळे रक्तपेढीत काम करणारे कर्मचारी, अधिकारी हतबल होत आहेत. एकीकडे रक्तासाठी रुग्ण बेडवर पडून आहेत. रक्ताची मागणी करत आहेत. मात्र मागणी करूनही रुग्णांना रक्त देता येत नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाही चांगलच गोंधळून गेले आहे.

रक्तपेढीतून शहर व जिल्हयातील शासकीय, निमशासकीय व खाजगी दवाखान्यामध्ये रक्ताचा पुरवठा केला जातो. विविध आजारात असणाऱ्या गरजू रुग्णांना रक्त दिले जाते. सध्या मागणीचे प्रमाण जास्त आणि रक्त पुरवठयाचे प्रमाण कमी अशी परिस्थितीत निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT