धम्म परिषदेत बोलताना भदंत वोनेयुंग. 
मराठवाडा

धम्म प्रचारासाठी बौद्ध उपासकांनी प्रयत्न करावेत : भदंत वोनेयुंग

जगदिश जोगदंड

पूर्णा (जि. परभणी) : संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भारतात अडीच हजार वर्षांपूर्वी उगम पावलेला तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म मधल्या काळात भारत देशात लोप पावत होता. परंतु, बौद्ध धम्म पुन्हा गतिमान करण्याचे मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. धम्म प्रचार व प्रसार अधिक गतिमान करण्यासाठी भिक्कू संघासह प्रत्येक बौद्ध उपासक, उपासिका यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत भदंत वोनेयुंग (द.कोरिया) यांनी शुक्रवारी (ता. ३१) व्यक्त केले.

पूर्णा येथील भदंत उपाली थेरो नगर परिसरात देश - विदेशातील शेकडो भंतेजींच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. ३१) बुद्धमूर्ती प्रतिष्ठापणा, बुद्ध विहाराच्या नूतन इमारतीचे उद्‍घाटन व सतराव्या बौद्ध धम्म परिषदेचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या हस्ते परिषदेचे उद्‍घाटन करण्यात आले. प्रसंगी राज्यमंत्री संजय बनसोडे, महापौर अनिता सोनकांबळे, डॉ. एस. पी. गायकवाड, सभापती अशोक बोकारे, शहाजी देसाई, रितेश काळे, सचिव ॲड. महेंद्र गायकवाड, प्रकाश ढोणे, प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, ॲड. रवी गायकवाड, प्राचार्य मोहनराव मोरे आदींची उपस्थिती होती.

‘लुम्बिनी’ स्मरणिकेचे प्रकाशन
या वेळी ‘लुम्बिनी’ स्मरणिकेचे प्रकाशन अखिल भारतीय भिक्खू संघाचे महासचिव भदंत प्रज्ञादीप महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, सकाळच्या सत्रात थायलंडचे भदंत फ्रा सूर्या व नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांच्या हस्ते धम्म ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून साऊथ कोरियाचे भदंत चेउंगडॅम व भदंत वोनेयुंग, म्यानमारचे भंते आयुपाला, डॉ. मैत्रिवीर नागार्जुन (हैदराबाद), भदंत प्रज्ञादीप महाथेरो यांच्यासह देश - विदेशातील शेकडो भंते उपस्थित होते. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता बुद्ध विहारात भव्य अशा बुद्धमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या वेळी सामुदायिक त्रिरत्न वंदना, पूजा, परित्राण घेण्यात आले. डॉ. आंबेडकर नगर येथून भिक्खू संघासह भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या परिषदेस डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व हजारो धम्म उपासक, उपासिका उपस्थित होते.


बुद्ध विहारासाठी निधी देणार : राज्यमंत्री बनसोडे
या वेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शरद पवार यांनी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणी कार्यात स्वतः लक्ष घातले असून त्यांनी त्या बाबत अत्यंत बारिकसारिक सूचना केल्या. डिसेंबर २०२२ पूर्वी हे जागतिक दर्जाचे दर्जेदार स्मारक पूर्ण होइल, असे त्यांनी सांगितले. येथील बुद्ध विहारासाठी मंजूर असलेला निधी प्राधान्याने देण्याचे त्यांनी अभिवचन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

Physics NEET Paper Leak Case : नीट फिजीक्सचा पेपर फोडणाऱ्या महिलेचे नाव समोर, सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; तीसरी पण 'मनिषा'च शोधली

America-Iran War: अमेरिका-इराण युद्ध केवळ पाच सेकंदात संपू शकतं; जागतिक वित्तीय संस्था 'जेफरीज'चा खळबळजनक दावा

Farmer loan waiver Maharashtra : शेतकरी कर्जमाफी आचारसंहितेत अडकणार का? पूर्वतयारी अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांनी गुपीत फोडलं

SCROLL FOR NEXT