file photo 
मराठवाडा

Video : विलगीकरणातील पोलिस कर्मचाऱ्यांना सोडले वाऱ्यावर...!

गणेश पांडे

परभणी : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे जिल्ह्यातील ३८ पोलिसांचे ठिकठिकाणी विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी १८ पोलिस परभणीच्या एका मंगल कार्यालयात असून या पोलिस कर्मचाऱ्यांना कसलीच व्यवस्था करून देण्यात आली नाही, असा आरोप पोलिसांकडून केला जात आहे.

परभणी जिल्ह्यातील एक पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, या पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात इतर पोलिस कर्मचारी आल्याने त्यांचे विलगीकरणांचे आदेश पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिले आहेत. असे एकूण ३८ पोलिस अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यातील १८ पोलिस कर्मचारी व अधिकारी परभणीतील अक्षदा मंगल कार्यालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. सोमवारी (ता. २५) सकाळी या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या मंगल कार्यालयातील खोल्यामध्ये ठेवण्यात आले आहे. 
एका-एका खोलीत चार ते पाच कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी शिक्षण विभागातील एक कर्मचारी देखरेखीसाठी ठेवण्यात आला आहे. परंतु, सोमवार सकाळपासून विलगीकरणात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही सुविधा देण्यात आली नाही, असा आरोप केला जात आहे. या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना साधी सॅनिटायझरीची व्यवस्थादेखील करून देण्यात आलेली नाही. हॅंडवॉशचा पत्ता नाही. तसेच त्यांना कालपासून जेवणदेखील देण्यात आले नाही, असे विलगीकरणात असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सहायक पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी
हा प्रकार उघड झाल्यानंतर मंगळवारी (ता. २६) सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी भेट दिली. त्यांनी अक्षदा मंगल कार्यालयातपाण्याची व्यवस्था नसल्याने तक्रारी आल्यामुळे सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी या ठिकाणी स्वतः जाऊन विलगीकरणात आलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाण्याचे जार पोचती केले.

प्रशासनाचे अन्न गेले कुठे?
जिल्हा प्रशासनाच्या वतीने विलगीकरण केलेल्या लोकांसाठी दररोज जेवण व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. परंतु, सोमवारपासून विलगीकरणात गेलेल्या १८ पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना जेवण दिल्या गेले नाही, असा आरोप करत हे जेवण गेले तरी कुठे, असा प्रश्न या पोलिस कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आरोग्य विभागाचेही दुर्लक्ष
विलगीकरण करून २४ तासांचा कालावधी झालेला असतांनाही या पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी किंवा नियमित तपासणीसाठी आरोग्य विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी या मंगल कार्यालयाकडे फिरकला नाही. यावरूनही आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे.


ही निंदनीय बाब आहे
आम्ही रात्रंदिवस या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उभे आहोत. परतु, आमचे कर्मचारी जेव्हा विलगीकरणात जातात तेव्हा त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही, ही निंदणीय बाब आहे. आपण वरिष्ठांपर्यंत ही बाब पोचविणार आहोत.
- नितीन बगाटे, सहायक पोलिस अधीक्षक, परभणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT