File photo 
मराठवाडा

हिंगोलीत महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः हिंगोली येथे  कोविडची लागण झालेल्या महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून या ठिकाणी महिला वैद्यकिय अधिकारी व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यातील पहिलेच कोविड सेंटर असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले जात आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.  मागील पंधरा दिवसांत रुग्णांचा आकडा चांगलाच वाढला असून आतापर्यंत पाच हजार १०९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चार हजार ६०५ रुग्ण बरे होऊन त्यांना सुट्टी दिली आहे. एकुण रुग्णांपैकी ३० टक्के महिला रुग्ण आहेत. 

त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानुसार हिंगोली शहरालगत लिंबाळा भागात अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहामध्ये फक्त महिलांसाठीच कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. 

या कोविड सेंटरमध्ये १०० रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली असून तातडीची गरज भासल्यास ऑक्सीजन सिलेंडर देखील ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी महिला रुग्णांवर उपचार करण्यासाठी महिला वैद्यकिय अधिकारी तसेच महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोविडची लक्षणे असलेल्या महिला रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली असल्यामुळे उपचार करणे सोयीचे झाले आहे.

दरम्यान कोविडची लक्षणे असलेल्या महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर हे राज्यातील पहिलेच केअर सेंटर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या महिला कोविड केअर सेंटरमध्ये सध्या पाच महिला रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोविडची गंभीर लक्षणे नसलेल्या महिलां रुग्णांना याच ठिकाणी उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याचेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

SCROLL FOR NEXT