Beed News esakal
मराठवाडा

Beed : कर्तव्यावर असताना जवान अविनाश आंधळे यांचे हृदयविकाराने निधन

भारतीय सैन्य दलात असलेल्या बीडचा जवान अविनाश आंधळे यांचे दिल्ली येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराने निधन झाले.

सकाळ डिजिटल टीम

बीड : भारतीय सैन्य दलात (Indian Army) असलेल्या तालुक्यातील हिंगणी (खु.) येथील जवान अविनाश कल्याण आंधळे यांचे दिल्ली येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराने निधन झाले. मंगळवारी त्यांना साश्रुनयांनी निरोप देण्यात आला. पोलिस व सैन्य दलाच्या वतीने हवेत बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना देऊन शासकीय इतमामात अविनाश आंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी अविनाश आंधळे 'अमर रहे'च्या घोषणा दिल्या. सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जवान अविनाध आंधळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (Beed)

धनंजय मुंडे ट्विटमध्ये म्हणतात, की आमच्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र, वीर स्व. अविनाश आंधळे यांचे दिल्ली येथे देशसेवेत असताना दुःखद निधन झाले. बीड जिल्ह्याच्या मातीत जन्मलेले अविनाथ सदैव आम्हा जिल्हावासीयांच्या हृदयात राहतील. आंधळे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे. स्व.अविनाश यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

भारतीय सैन्यात कार्यरत बीड तालुक्यातील हिंगणी (खु) गावचे वीर जवान अविनाश कल्याण आंधळे यांचे कर्तव्यावर असताना शहीद झाले. जिल्ह्याच्या भूमिपुत्राने राष्ट्रसेवेत सर्वस्व अर्पण केले. अविनाश यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT