नवीन नांदेड : चार ते पाच वर्षात अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रमात जेमतेम ५० टक्केच प्रवेश झाले आहे. विशेषत्वाने पदविका प्राप्त विद्यार्थी बी.ई.साठी प्रवेश घेत असतात त्यामुळेही पदविका प्राप्त पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा औद्योगिक जगतात प्रचंड तुटवडा जाणवत आहे.
ट्रेनींनाच मिळतेच पगारवाढ
नांदेडच्या ग्रामीण तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षासाठी २६१ विद्यार्थी असून आतापर्यंत १३१ विद्यार्थ्यांना संस्थेने कॅम्पस प्लेसमेंट दिले आहे. १७ विविध कंपन्या एप्रिल, २०२० पर्यंत ग्रामीण संस्थेत कॅम्पस प्लेसमेंट घेणार आहेत. अनेक नामवंत कंपन्यांनी मागील काही वर्षांपासून ट्रेनी इंजिनीअर म्हणून कमी पगारावर शिकाऊ विद्यार्थी ठेवण्याचा पायंडा निर्माण केला होता. परंतु, सद्यपरिस्थितीत विद्यार्थीच मिळत नसल्याने आहे त्या ट्रेनी उमेदवारांना पगारवाढ दिली जात आहे. तसेच नवीन शिकाऊ उमेदवार घेताना ऑन-रोल-रिक्रुटमेंट करून थेट पगारावर उमेदवार निवडले जात आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रासाठी चांगले दिवस येत आहेत.
येणाऱ्या काळात होणार फायदा
ग्रिफो टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनी मार्फत संस्थेतील २५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना २२००० ते २५००० प्रतिमाह व इतर सुविधा मिळणार आहेत. यावेळी टाटा मोटर्स, बजाज, एचसीएल, जॉन डिअर या कंपन्यांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांची निवड केली असून संस्थेने १० ते १२ कंपन्याना विद्यार्थी पुरविणे शक्य नसल्याने त्यांचे प्लेसमेंट राखीव ठेवले आहे. तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरी व रोजगाराची वाणवा संपली असून याचा येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
हे देखील वाचा - वातावरण बदलामुळे वाढतेय कोरोनाची भीती, लातूरातील शाळा सतर्क
कौशल्यपूर्ण अभियंत्यांची उद्योजगताला गरज
जुने अभियांत्रिकी शिक्षण हे ‘अन्यालीसीस’वर आधारित होते. उद्योग जगताला आता ‘सिन्थेसिस’ वर आधारित प्रात्यक्षिक अनुभवाची गरज भासत आहे. याच दृष्टिकोनातून तांत्रिक शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून अनुभवाद्वारे दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे असते. २०२०मध्ये समाजापुढे पाणी, वीज, रस्ते, दळणवळण, ऊर्जा, इन्फ्रास्ट्रुक्टर आदी समस्या उभ्या आहेत. या सर्वांवर विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पर्याय निर्माण होणे गरजेचे आहे. तांत्रिक शिक्षण उत्तमपणे विद्यार्थ्यांच्या मेंदूवर बाणवले तर त्यांच्या हाती केवळ पदवीचा कागदच नसून त्यांच्या डोक्यात प्रकल्प निर्माण होतील. अश्या पदवीधरांना नोकऱ्या शोधण्याची गरजच भासणार नाही. असेच अभियंते आज उद्योगजगताला हवे आहेत.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला ‘कोरोना’चा तिसरा संशयीत
शिक्षण व नोकरीतील दरी कमी व्हावी
तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढून शिक्षण व नोकरी यांच्यातील दरी कमी होण्यासाठी शिक्षण संस्थांनी प्रयत्न करावेत. कारण येणारा काळ नक्कीच अभियांत्रिकी शिक्षणासाठी सुवर्णकाळ असणार आहे.
- प्राचार्य डॉ. विजय पवार (ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपुरी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.